आयपीएल 2024 बाबत क्रिकेट चाहत्यांना गेल्या अनेक दिवसांपासून ज्या क्षणाची प्रतिक्षा होती, ती वेळ अखेर आली आहे. कारण आयपीएलच्या 17 व्या मोसमाचा श्रीगणेशा आजपासून होत आहे. सलामीच्या सामन्यात गतविजेता चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने भिडणार आहेत. या सामन्याचं आयोजन हे चेन्नईतील चेपॉक अर्थात एमए चिदंबरम स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.
याबरोबरच या सामन्याआधी ओपनिंग सेरेमनी आयोजीत करण्यात आली आहे. तसेच या कार्यक्रमाला अनेक दिग्गज कलाकार, संगीतकार आणि गायक सहभागी होणार आहेत. यामध्ये अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ परफॉर्म करणार आहेत. तर सोबतच एआर रहमान आणि सोनू निगम हे दोघे खास गाणी सादर करणार आहेत. तर कार्यक्रमानंतर सामन्याला सुरुवात होणार आहे. तसेच चाहत्यांना हा कार्यक्रम जिओ सिनेमावर लाईव्ह पाहता येणार आहे.
The stage is set, the lights are bright, and the stars are ready to shine at the #TATAIPL 2024 Opening Ceremony! 🎉🥳
Get ready for an unforgettable fusion of cricket and entertainment ft. a stellar lineup! ✨
🗓22nd March
⏰6:30 PM onwards pic.twitter.com/7POPthFITx— IndianPremierLeague (@IPL) March 20, 2024
अशातच आयपीएलच्या 17 व्या हंगामात अनेक गोष्टी वेगळ्या होणार आहेत. अनेक खेळाडू हे पुनरागमन करणार आहेत. तर टी 20 वर्ल्डकपच्या तोंडावर भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी अनेक खेळाडू प्रयत्नशील असणार आहेत. यात विराट कोहलीपासून इशान किशन पर्यंत अनेकांचा समावेश आहे. तसेच ऋषभ पंत कितपत फिट झाला आहे याची चाचणी देखील आयपीएलमध्येच होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
- आयपीएलच्या 17व्या हंगामापूर्वी चेन्नईसाठी आनंदाची बातमी, ‘हा’ दिग्गज गोलंदाज लवकरच होणार संघात दाखल
- IPL सुरू होण्यापूर्वी या दोन टीमने केला मोठा फेरबदल, या 2 खेळाडूंची अखेरच्या क्षणी निवड