IPL 2024 Schedule: आयपीएलचा 17वा सीझन 22 मार्च ते 26 मे दरम्यान खेळवला जाणार आहे. याआधी महिला प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात येणार आहे. महिला प्रीमियर लीगचे सामने 22 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान खेळवले जातील. एका अहवालात ही बाब समोर आली आहे.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने आयपीएल 2024 च्या तारखा निश्चित केल्या आहेत. या अंतर्गत 22 मार्च रोजी सलामीचा सामना तर 26 मे रोजी अंतिम सामना होणार आहे. मात्र, यावर अंतिम मंजुरीची शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. जर हे वेळापत्रक अंतिम ठरले तर त्यानुसार ही स्पर्धा टी20 विश्वचषकाच्या अवघ्या 5 दिवस आधी संपेल. टी20 विश्वचषक 2024 1 जूनपासून वेस्ट इंडिज आणि यूएसमध्ये सुरू होणार आहे. मात्र, भारतीय संघाला पहिला सामना 5 जूनला खेळायचा आहे.
आयपीएलच्या या वेळापत्रकाचा या वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांवर परिणाम होऊ शकतो. खरे तर आयपीएल खेळायचे आहे, तेव्हा लोकसभेच्या निवडणुकाही भारतभर होणार आहेत. वेगवेगळ्या टप्प्यांत होणाऱ्या या निवडणुका मार्चपासून सुरू होऊन मेपर्यंत चालणार आहेत. अशा स्थितीत बीसीसीआय आधी आयपीएलच्या वेळापत्रकावर सरकारशी चर्चा करण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुका असूनही आयपीएल यंदा भारतात होईल, अशी आशा आहे. वास्तविक, 2009 आणि 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएल भारताबाहेर आयोजित करण्यात आली होती. परंतु, 2019 मध्ये तसे करण्याची वेळ आली नाही.
जर आयपीएलच्या या तारखा अंतिम राहिल्या तर भारतीय खेळाडूंना इंग्लंड कसोटी मालिकेनंतर फक्त 10 दिवसांचा ब्रेक मिळेल. इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना 7 ते 11 मार्च दरम्यान खेळवला जाणार आहे. (The 17th season of IPL will start from March 22 while the final will be held on May 26)
हेही वाचा
हार्दिक पंड्या मैदानात परतण्यासाठी घेतोय मेहनत, फोटो शेअर करून दिले संकेत
सचिन, कुंबळे, मितालीपासून सायना नेहवालपर्यंत… हे स्पोर्ट्स स्टार पोहोचले अयोध्येत; फोटो पहा