कोरोना महामारीचा मागील चार महिन्यांपासून क्रिकेटवर प्रचंड मोठा परिणाम झाला आहे. २०२० मधील सर्व लहान-मोठ्या स्पर्धा कोरोना विषाणूमुळे स्थगित झाल्या आहेत. त्यामुळे क्रिकेट क्षेत्रातील दरवर्षासारखा थरार यावर्षी आतापर्यंत तरी पाहायला मिळाला नाही.
तरी कोरोनाच्या संकटातही क्रिकेटला सुरुवात झाली. ११७ दिवसांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटने पुनरागमन केले. पण त्याचदरम्यान, येत्या काही महिन्यांतील अनेक मालिका आणि मोठ्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. हे वर्ष एक प्रकारे क्रिकेटसाठी दुष्काळी वर्ष असल्याचे सिद्ध झाले आहे.
परंतु हा वर्ष संपण्यास अद्याप काही महिने शिल्लक आहेत. यावेळी बर्याच स्पर्धा आगामी काळात खेळल्या जाणार आहेत. या लेखात चालू वर्षात खेळल्या जाणार्या मोठ्या स्पर्धा किंवा मालिकांबद्दल जाणून घेणार आहोत.
आयपीएल २०२०-
यंदाचा आयसीसी टी-२० विश्वचषक कोरोना विषाणूमुळे पुढे ढकलला गेला आहे. त्यामुळे टी-२० क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या सत्राचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यावर्षी आयपीएलच्या हंगामाचे आयोजन करण्यास बीसीसीआय उत्सुक आहे. आयपीएलचा हा हंगाम १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरु होऊ शकतो, अशी पुष्टी आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी दिली आहे. त्यामुळे आता आयपील पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आयपीएलमध्ये जगभरातील अनेक दिग्गज क्रिकेटपटू खेळत असतात.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिका-
कोरोना विषाणूमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंद झाल्याने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये मार्चमध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका होणार होती. मार्चमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ तीन वनडे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतात आला होता, परंतु कोरोनाच्या संकटामुळे ती मालिका रद्द केली.
परंतु, पुन्हा एकदा बीसीसीआय आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिका यांच्यात आयपीएलपूर्वी ही मालिका खेळण्याबाबद चर्चा सुरु आहे. त्यामुळे कदाचित आयपीएलपूर्वी भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ आमने-सामने येऊ शकतात.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत मालिका-
यावर्षाच्या अखेरीस भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौर्यावर जाणार आहे. तेथे टी२०, वनडे आणि कसोटी मालिका खेळली जाणार आहे.
या दौर्यावर डिसेंबर महिन्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून आयपीएल २०२०चा मोसमही १० नोव्हेंबरच्या आधी संपवला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत क्रिकेट जगातील दोन सर्वोत्कृष्ट संघांदरम्यान होणारी ही मालिका पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक असतील.
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिका
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने संपूर्ण सावधगिरीने, पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात इंग्लंडमध्ये तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे.
हे पाहता क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील मर्यादित षटकांची मालिका सप्टेंबरमध्ये निश्चित होणार असल्याचे दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सौरव गांगुली व्हावा आयसीसीचा अध्यक्ष, श्रीलंकेच्या या दिग्गज क्रिकेटपटूने दिला पाठिंबा
आता हिंदीमध्येही वाचायला मिळणार क्रिकेटचे नियम; भारताच्या या पंचाने केले नियमांचे भाषांतर
ट्रेंडिंग लेख-
यूएईमध्ये आयपीएल सामन्यात सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारे फलंदाज; एका भारतीयाचा समावेश
२०२० आयपीएल युएईमध्ये झाली, तर दिल्ली कॅपिटलचे हे ४ खेळाडू करु शकतात दमदार कामगिरी
काय सांगता! या ३ वेळेला संपूर्ण संघाला मिळूनही करता आल्या नाहीत १० धावा