---Advertisement---

यूएईमध्ये आयपीएल सामन्यात सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारे फलंदाज; एका भारतीयाचा समावेश

On: सोमवार, सप्टेंबर 14, 2020 5:59 PM
---Advertisement---

आयपीएलच्या १३ व्या मोसमाचे आयोजन १९ सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अंतिम सामना १० नोव्हेंबर रोजी खेळविण्यात येणार आहे. आयपीएलचे आयोजन यूएईमध्ये होणार आहे. आयपीएल यूएईमध्ये आयोजित करण्याची ही दुसरी वेळ असेल.

२०१४ साली भारतात लोकसभा निवडणुका होणार होत्या, त्यामुळे यापूर्वी आयपीएल २०१४च्या सुरुवातीच्या २० सामन्यांचे आयोजन बीसीसीआयने यूएईमध्ये केले होते. यूएईमध्ये झालेल्या आयपीएल सामन्यांमध्येही रोमांच पहायला मिळाला होता. यादरम्यान फलंदाजांनी धडाकेबाज फलंदाजी करत जलद अर्धशतके ठोकली होती.

चला तर मग जाणून घेऊया यूएईमध्ये खेळवण्यात आलेल्या आयपीएल सामन्यादरम्यान सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणाऱ्या फलंदाजांबद्दल…

१. डेव्हिड मिलर (किंग्ज इलेव्हन पंजाब)

तसं पाहिलं तर आयपीएल (IPL) इतिहासात सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा विक्रम भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलच्या नावावर आहे. त्याने २०१८ मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (Delhi Capitals) खेळताना अवघ्या १४ चेंडूत अर्धशतक केले होते. परंतु जर यूएईमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणाऱ्या फलंदाजाबद्दल बोलायचं झालं, तर त्यामध्ये डेव्हिड मिलरचा (David Miller) समावेश होतो. मिलरने २०१४ च्या आयपीएलमध्ये दुबई येथील शारजाह क्रिकेट मैदानावर राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात १९ चेंडूत अर्धशतक ठोकले होते. त्याच्या या अर्धशतकात ६ षटकारांचा समावेश आहे. २० एप्रिल २०१४ रोजी खेळण्यात आलेल्या सामन्यात मिलरने ५१ धावांची खेळी केली होती.

२. ग्लेन मॅक्सवेल (किंग्ज इलेव्हन पंजाब)

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) यूएईमध्ये खेळण्यात आलेल्या आयपीएलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक करणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. २२ एप्रिल २०१४ रोजी शारजाह क्रिकेट मैदानावर सनरायझर्स हैद्राबाद (Sunriser Hyderabad) संघाविरुद्ध मॅक्सवेलने ४३ चेंडूत ९५ धावा ठोकल्या होत्या. त्यामध्ये ५ चौकार आणि ९ षटकारांचा समावेश आहे. तो सामना पंजाब संघाने ७२ धावांनी जिंकला होता. याव्यतिरिक्त मॅक्सवेलने यूएईमध्ये २५ चेंडूत अर्धशतक झळकावण्याचा कारनामाही केला आहे. १८ एप्रिल २०१४ रोजी अबू धाबी येथे चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध मॅक्सवेलने ४३ चेंडूत ९५ धावांची खेळी केली होती. त्यात २ षटकार आणि १५ चौकारांचा समावेश आहे.

३. ड्वेन स्मिथ (चेन्नई सुपर किंग्ज)

आयपीएल २०१४ मध्ये ड्वेन स्मिथने (Dwayne Smith) चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून (Chennai Super Kings) खेळताना राजस्थान रॉयल्सविरुद्ध (Rajasthan Royals) २८ चेंडूत अर्धशतक ठोकले होते. २३ एप्रिल २०१४ रोजी खेळण्यात आलेल्या दुबई येथील सामन्यात स्मिथने २८ चेंडूत ५० धावा केल्या होत्या. त्यामध्ये ६ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. तो सामना चेन्नईने ७ धावांनी जिंकला होता.

४. युवराज सिंग (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर)

युएईमध्ये खेळण्यात आलेल्या सामन्यात युवराज सिंगने (Yuvraj Singh) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challenger Bangalore) संघाकडून जबरदस्त कामगिरी केली होती. त्याने दिल्ली डेअरडेविल्स (आताचे दिल्ली कॅपिटल्स) विरुद्ध शारजाह क्रिकेट मैदानावर २८ चेंडूत अर्धशतक ठोकले होते. २०१४ साली युवराज आरसीबी संघाचा भाग होता. त्याने १७ एप्रिल २०१४ रोजी दुबईत खेळण्यात आलेल्या सामन्यात २९ चेंडूत नाबाद ५२ धावांची खेळी केली होती. त्यामध्ये ३ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश आहे. तो सामना आरसीबीने ८ विकेट्सने जिंकला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

-आता हिंदीमध्येही वाचायला मिळणार क्रिकेटचे नियम; भारताच्या या पंचाने केले नियमांचे भाषांतर

-आयपीएलमधील ‘हा’ संघ घेऊन येत आहे डॉक्यूमेंटरी सिरिज; नाव आहे…

-वीजेचे बिल पाहून हा क्रिकेटपटू भडकला; म्हणाला, संपूर्ण मोहल्ल्याचे बिल पाठवले की काय…

ट्रेंडिंग लेख-

-अगदी सौरव तिवारीपासून ‘या’ ६ कर्णधारांच्या अंडर खेळलाय धोनी

-टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग ३- गब्बरची कसोटी क्रिकेटमध्ये जबर एन्ट्री

-निराशाजनक! पदार्पणाच्या वनडे सामन्यातच नर्वस नाइंटिजचे शिकार झालेले ५ क्रिकेटपटू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---