---Advertisement---

अगदी सौरव तिवारीपासून ‘या’ ६ कर्णधारांच्या अंडर खेळलाय धोनी

On: शनिवार, जुलै 25, 2020 9:19 PM
---Advertisement---

माजी कर्णधार एमएस धोनीने आपल्या नेतृत्वात भारतीय संघाला एक वेगळे स्थान मिळवून दिले आहे. धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने आयसीसीचे २ विश्वचषक तसेच चॅम्पियन्स ट्रॉफीवरही आपले नाव कोरले आहे. धोनीच्या नेतृत्वात अनेक नवीन खेळाडूंना संधी मिळाली आहे. परंतु ज्यांच्या नेतृत्वाखाली धोनी खेळला आहे, अशा कर्णधारांबद्दल फार थोड्या चाहत्यांना माहिती असेल.

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की धोनी सौरव गांगुली (Sourav Ganguly), विराट कोहली (Virat Kohli) यांच्या नेतृत्वात खेळला आहे. परंतु फार कमी चाहत्यांना माहिती असेल की धोनी अनिल कुंबळेच्या (Anil Kumble) नेतृत्वातही खेळला आहे. दिग्गज गोलंदाज कुंबळेने २००७ ते २००८ दरम्यान १४ कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले. यादरम्यान धोनी त्याच्या नेतृत्वात खेळला होता.

आयपीएलमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून धोनी स्टिव्ह स्मिथच्या (Steve Smith) नेतृत्वात खेळला आहे. २०१६मध्ये धोनीकडे पुण्याचे कर्णधारपद होते. त्यानंतर दुसऱ्या वर्षी म्हणजेच २०१७मध्ये स्मिथ पुण्याचा कर्णधार झाला होता.

धोनी श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू माहेला जयवर्धनेच्या (Mahela Jayawardene) नेतृत्वातही खेळला आहे. २००७मध्ये आशिया इलेव्हन आणि आफ्रिका ११ संघात खेळण्यात आलेल्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत धोनी जयवर्धनेच्या नेतृत्वातील संघ आशिया इलेव्हनचा भाग होता.

याव्यतिरिक्त धोनी सौरभ तिवारीच्या (Saurabh Tiwari) नेतृत्वातही खेळला आहे. २०१७-१८ मध्ये विजय हजारे ट्रॉफीमध्ये झारखंडचे प्रतिनिधित्व करताना धोनी तिवारीच्या नेतृत्वात मैदानावर उतरला होता.

महत्त्वाच्या बातम्या- 

निराशाजनक! पदार्पणाच्या वनडे सामन्यातच नर्वस नाइंटिजचे शिकार झालेले ५ क्रिकेटपटू

आयपीएल २०२० खेळण्यासाठी खेळाडूंना देणार का परवानगी, पहा ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडचा काय आहे निर्णय

बेन कटिंगने खरेदी केला आलिशान बंगला; किंमत ऐकून व्हाल हैराण

ट्रेंडिंग लेख- 

टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग ३- गब्बरची कसोटी क्रिकेटमध्ये जबर एन्ट्री

इंग्लंडला पहिला विश्वचषक जिंकून देणारा खेळाडू २७ व्या वर्षी निवृत्त झाला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---