---Advertisement---

बेन कटिंगने खरेदी केला आलिशान बंगला; किंमत ऐकून व्हाल हैराण

On: शनिवार, जुलै 25, 2020 6:51 PM
---Advertisement---

मुंबई । ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू बेन कटिंग आणि एरिन हॉलंड हे बर्‍याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते. यावर्षी त्यांचे लग्न होणार होते. परंतु कोविड-19 या साथीच्या आजाराने त्यांची ही योजना विस्कळीत झाली. तथापि, या जोडप्याने सिडनीच्या कोगी येथे दोन बेडरूमचा एक अलिशान बंगला विकत घेतला आहे, ज्याची किंमत 8.9 कोटी आहे. कटिंगने ऑस्ट्रेलियाकडून 4 टी -20 आणि 7 एकदिवसीय सामने खेळले आहेत.

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) गेल्या काही मोसमात तो मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबादकडून खेळला होता. दुसरीकडे एरिन एक टीव्ही होस्ट तसेच गायक, मॉडेल आणि नर्तक आहे. एरीन हॉलंडने आयपीएल 2018 मध्ये देखील अँकरिगदेखील केले होते. एरिन हॉलंडने 2013 साली मिस वर्ल्ड ऑस्ट्रेलियाचे विजेतेपद मिळवले आहे. नवीन बंगला घेतल्यामुळे एरिन हॉलंडला आनंद झाला आहे.

डेली टेलीग्राफशी बोलताना ती म्हणाली, “आम्हाला यावर्षी सिडनी मार्केटमध्ये प्रवेश करायचा होता आणि कोविडच्या दरम्यान आम्ही हा प्रवेश केल्याने आनंद झाला आहे.”

गेल्या वर्षी ब्रिस्बेनच्या तोफ हिलमधील त्यांचे जुने घर त्यांनी 1.6 दशलक्ष डॉलर्समध्ये विकले. त्यापैशात बेन कटिंग आणि एरिन हॉलंड यांनी आलिशान घर विकत घेतले. या क्रिकेटपटूने तीन वर्षांपूर्वी 530,000 डॉलर्समध्ये जमीनही विकत घेतली होती आणि हॅम्प्टन शैलीतील चार बेडरूमचे एक सुंदर घर बांधले होते.

या जोडप्याचे नवीन घर कोओगी समुद्रापासून थोड्या अंतरावर आहे, जे की या जोडप्यासाठी ही आनंददायी जागा आहे. बेन आणि एरिन यावर्षी जूनमध्ये लग्न करणार होते. परंतु त्यांनी कोरोना साथीच्या आजारामुळे हे स्थगित केले.

यावर बेन म्हणाला, “जोपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येत नाही तो परत मी लग्नाबाबत विचार करणार नाही. मी माझे लग्न मोठ्या धूमधडाक्यात आणि माझ्या मित्रांच्या उपस्थितीत करणार आहे.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---