भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या मान्यतेने ६७ व्या अखिल भारतीय पोलीस कबड्डी स्पर्धेचं आयोजन जयपूर-राजस्थान येथे करण्यात आले आहे. दिनांक २७ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत ही स्पर्धा होणार असून देशातील २८ पुरुष व १८ महिला पोलीस संघ सहभागी झाले आहेत.
आज कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली. सकाळ सत्रात पुरुष विभागात पहिला सामना महाराष्ट्र पोलीस विरुद्ध ओडिशा पोलीस यांच्यात झाला. मध्यंतरापर्यत २३-१२ अशी आघाडी मिळणाऱ्या महाराष्ट्र संघाने ४४-२४ अशी विजयी सलामी दिली. सीआयएसफ ने चंदीगड संघाचा ४१-२१ असा पराभव करत विजयी सलामी दिली.
आयटीबीपी विरुद्ध छत्तीसगड सामन्यात आयटीबीपीने ३२-०२ असा एकतर्फी विजय मिळवला. उत्तराखंडने बीएसफ चा ४१-२१ असा पराभव केला.

महिला विभागात महाराष्ट्र पोलीस संघाने ४४-०० असा जन्मू काश्मीरचा पराभव केला. महाराष्ट्र महिला पोलीस संघाने जन्मू काश्मीरला गुणांचा खात ही उघडू दिला नाही. पंजाबने हिमाचल प्रदेशवर ४८-२९ असा विजय मिळवला. छत्तीसगड विरुद्ध बीएसफ यांच्यात चुरशीची लढत झाली. मध्यंतरा पर्यत १६-१६ असा बरोबरीत असलेला सामना छत्तीसगडने ३३-२९ असा जिंकला.

ऑल इंडिया पोलीस कबड्डी स्पर्धा, जयपूर
दिवस पहिला सकाळ सत्रातील निकाल
पुरुष विभाग
१) महाराष्ट्र ४४ विरुद्ध ओडिशा २४
२) सीएयएसफ ४१ विरुद्ध चंदीगड २१
३) आयटीबीपी ३२ विरुद्ध छत्तीसगड ०२
४) उत्तराखंड ४१ विरुद्ध बीएसफ २१
५) तामिळनाडू ३७ विरुद्ध तेलंगणा १०
६) पंजाब ४५ विरुद्ध गोवा ०९
महिला विभाग
१) हिमाचलप्रदेश २९ विरुद्ध पंजाब ४८
२) महाराष्ट्र ४४ विरुद्ध जन्मू काश्मीर ००
३) छत्तीसगड ३३ विरुद्ध बीएसफ २९
४) हरियाना ३३ विरुद्ध दिल्ली २७
५) कर्नाटका ३२ विरुद्ध उत्तरप्रदेश २१
६) तामिळनाडू २६ विरुद्ध सीआरपीएफ ३६






