भारतीय संघाचा आयर्लंड दौरा घोषित झाला आहे. आयर्लंड क्रिकेट संघाकडून भारताच्या या दौऱ्याची माहिती चाहत्यांना मिलाली आहे. भारतीय संघाला तीन सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आयर्लंड दौरा करणार आहे. 18 ऑगस्ट रोजी भारत आणि आयर्लंड यांच्यातील पहिला टी-20 सामना खेळला जाणार आहे. मालिकेतील 20 आणि 23 ऑगस्ट रोजी दुसरा आणि तिसरा सामना खेळला जाईल. तिन्ही सामने डबलिनचा बाहेरचा भाग मालाहाइडमध्ये खेळले जातील.
भारत आणि आयर्लंड यांच्यातील टी-20 मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक –
पहिला सामना – 18 ऑगस्ट
दुसरा सामना – 20 ऑगस्ट
तिसरा सामना – 23 ऑगस्ट
आयर्लंड क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वॉरेन ड्यूट्रोम यांनी या मालिकेविषयी सविस्तर माहिती दिली. सोबतच आपल्या व्यस्त वेळापत्रकात देखील आयर्लंड दौरा केल्याबद्दल बीसीसीआयचे आभार मानले. वॉरेन ड्यूट्रोम म्हणाले की, “आम्ही 12 महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा भारतीय संघाचे आयर्लंडमध्ये स्वागत करण्यासाठी खुश आहोत. 2022 मध्ये झालेल्या दोन सामन्यांचे सर्व तिकिट विकले गेले होते. अशात यावर्षी होणाऱ्या तीन सामन्यांच्या मालिकेतून प्रेक्षकांना हा आनंद लुटण्यासाठी अधिक संधी मिळतील. हा क्षण नेहमीच लक्षात राहण्यासारखा आहे.”
“बीसीसीआयचे धन्यवाद. भारतीय संघाच्या व्यस्त वेळापत्रकात आयर्लंडचा समावेश करण्यासाठी आणि प्रेक्षकांसाठी अनुकूल अशी मालिका आयोजित करण्यासाठी. शुक्रवार आणि रविवारी सामना असल्यामुळे प्रेक्षक मोठ्या संखेने येऊ शकतात,” असेही वॉरेन पुढे म्हणाले.
दरम्यान, एक महिन्याच्या मोठ्या विश्रांतीनंतर 12 जुलै रोजी भारतीय संघाचा वेस्ट इंडीज दौरा सुरू होणार आहे. वेस्ट इंडीजमध्ये भारताला दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. 13 ऑगस्ट रोजी हा दौरा संपल्यानंतर संघ थेट आयर्लंडसाठी रवाना झाला. आगामी वनडे विश्वचषक 5 ऑक्टोबर रोजी सुरु होणार असून मंगळवारी (27 जून) बीसीसीआयने विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. वनडे विश्वचषकात खेळाडूंना लागोपाठ सामने खेळावे लागणार आहेत. अशात त्याआधी आयर्लंड दौऱ्यात संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. (The announcement of the Indian team’s tour to Ireland)
महत्वाच्या बातम्या –
WC 2023 । न्यूझीलंडचा कर्णधार आगामी विश्वचषकात खेळणार? चाहत्यांसाठी आनंदाची बातमी
विश्वचषकात वापरली जाणारी राउंड रॉबिन पद्धत आहे तरी काय? वाढवणार टीम इंडियाची चिंता