अॅशेस मालिका ही कसोटी क्रिकेटमधील मानाची स्पर्धा मानली जाते. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामधील लोकांमध्ये कसोटी क्रिकेटमधील सर्वात प्रसिद्ध मालिका ‘अॅशेस’ ची एक वेगळी क्रेझ आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याप्रमाणेच अॅशेसचा सामना प्रेक्षकांना आवडतो.
इंग्लंडने लॉर्ड्सच्या मैदानावर ७५ वर्षांनंतर मिळवला विजय
लॉर्ड्सला क्रिकेटची पंढरी म्हणतात. पण क्रिकेटचा जनक असलेल्या इंग्लंडला आपल्याच देशात अॅशेस मालिकेतील सामना लॉर्ड्सवर जिंकण्यासाठी ७५ वर्षे वाट पाहावी लागली. १३ वर्षांपूर्वी, म्हणजे २० जुलै २००९ रोजी, इंग्लंडने लॉर्ड्सवर ७५ वर्षानंतर ऑस्ट्रेलियाचा अॅशेस मालिकेत पराभव करण्यात यश मिळवले.
या विजयाचा नायक अँड्र्यू फ्लिंटॉफ होता, त्याने सामन्याच्या चौथ्या डावात पाच विकेट्स घेतल्या आणि ऑस्ट्रेलियाच्या सामना अनिर्णित करण्याच्या आशा नष्ट केल्या.
इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना अँड्र्यू स्ट्रॉसच्या १६१ धावा आणि अॅलिस्टर कूकच्या ९५ धावांच्या मदतीने ४२५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया संघाचा पहिल्या डाव जेम्स अँडरसनच्या चार विकेट्समुळे ४१५ धावांवर आटोपला.
इंग्लंडने ३११/६ धावांवर दुसरा डाव घोषित केला आणि ५२२ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियाला मैदानात बोलावले. चौथ्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने बरीच झुंज दिली. मायकल क्लार्कने १३६ धावांची खेळी केली. याशिवाय हेडनने ८० आणि मिशेल जॉन्सनने ६३ धावा केल्या.
असे असूनही, फ्लिंटॉफच्या गोलंदाजीच्या माऱ्याने ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ ४०६ धावांत आटोपला. इंग्लंडने हा सामना ११५ धावांनी जिंकला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
भारताप्रमाणेच ‘या’ संघांनीही केलेला कर्णधारपदासोबत प्रयोग, एका वर्षात सहा-सात खेळाडूंनी केले नेतृत्व
WIvsIND: सामन्याअगोदरच कॅप्टन ‘धवन’च्या रागाचा चढला पारा! पत्रकार परिषदेत बोलून गेला असे काही..
WIvIND: ‘या’ भारतीयांनी सर्वाधिक कॅरेबियन फलंदाजांना दाखवलाय तंबूचा रस्ता; दिग्गजांसह युवाही सामील






