रविवारी ऍशेस मालिकेत (ashes series) एक रोमांचक सामना पाहायला मिळाला. मालिकेतील चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या दिवसापासून आघाडीवर होता. परंतु रविवारी इंग्लंड संघ सामना अनिर्णीत करण्यात यशस्वी ठरला. इंग्लंडचे जेम्स अँडरसन (James Anderson) आणि स्टुअर्ट ब्रॉड (Stuart broad) शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहीले आणि संघाला पराभूत होण्यापासून वाचवले. सामन्याच्या शेवटच्या षटकात चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes) याने तर सामन्याच्या शेवटच्या काही क्षणांमध्ये स्वतःचे डोळे झाकले होते.
इंग्लंडने सामन्याच्या शेवटच्या दिवशी ९ विकेट्सच्या नुकसानावर २७० धावा केल्या आणि सामना अनिर्णीत केला. ऑस्ट्रेलियाने संघाच्या हातातून हा सोपा विजय अवघ्या एका विकेटच्या कमतरतेमुळे निसटला. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज स्टीव स्मिथ (steve smith) सामन्याच्या शेवटच्या डावात गोलंदाजी करण्यासाठी आला होता आणि त्यांच्या संघाला विजयासाठी एका विकेटची आवश्यकता होती.
स्मिथने टाकलेल्या शेवटच्या षटकात जेम्स अँडरसन स्ट्राइकवर होता. अँडरसनने षटकातील पहिले पाच चेंडू व्यवस्थित खेळले होते आणि संघाला एकही धाव मिळाली नव्हती. परंतु, शेवटच्या चेंडूवर स्वतःची विकेट राखण्याचे मोठे आव्हान त्याच्यापुढे होते. अँडरसनने जर शेवटच्या चेंडूवर विकेट गमावली असती, तर ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा इंग्लंडवर विजय मिळवला असता. शेवटचा चेंडू फेकला जाण्यापूर्वी चाहत्यांच्या ह्रुदयाचे ठोके वाढले होते. इंग्लंडच्या बेन स्टोक्सची अवस्था देखील अशीच काहीशी होती. स्टोक्सने शेवटचा चेंडू टाकला जात असताना स्वतःचे डोळे टी-शर्टच्या मदतीने झाकून घेतले. अँडरसनने जेव्हा शेवटचा चेंडू योग्य प्रकारे खेळला आणि सामना अनिर्णीत झाल्यानंतर स्टोक्सने डोळे उघडले. त्यावेळी स्टोक्सचा चेहरा पूर्णपणे लाल झाल्याचे पाहायला मिळाला. सोशल मीडियावर स्टोक्सचे हे फोटो व्हायरल होत आहेत.
The final over adventures of Ben Stokes ???? #Ashes pic.twitter.com/Kil9XNG3cE
— 7Cricket (@7Cricket) January 9, 2022
दरम्यान इंग्लंडला विजय मिळवण्यासाठी शेवटच्या डावात तब्बल ३८८ धावांची आवश्यकता होती, तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी शेवटच्या डावात इंग्लंडच्या १० विकेट्स घेणे गरजेचे होते. ऑस्ट्रेलियाला १० विकेट्स घेता आल्या नाहीत आणि इंग्लंडही मिळालेल्या लक्ष्यापर्यंत पोहचला नाही. अशात ऍशेस मालिकेतील हा चौथा सामना अनिर्णीत राहिला.
ऍशेल मालिकेती पहिल्या तीन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया संघाने विजय मिळवला आहे आणि ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. परंतु चौथ्या सामना अनिर्णीत झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाला मालिका क्लीन स्वीप करता येणार नाही. उभय संघातील पाचवा सामना पाहण्यासारखा असेल. इंग्लंड स्वतःची लाज राखण्यासाठी शेवटच्या सामन्यात विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असेल.
महत्वाच्या बातम्या –
Ashes: ऑस्ट्रेलियाच्या तोंडून विजयाचा घास हिसकावत इंग्लंडने अनिर्णित राखली ‘थरारक’ सिडनी कसोटी
निवृत्ती घेण्यापूर्वी खेळाडूंना बोर्डाला द्यावी लागणार नोटीस, वैतागलेल्या श्रीलंका क्रिकटचे कडक नियम
ऍशेसच्या चौथ्या सामन्यासाठी इंग्लंडने घ्यावी टीम इंडियाकडून प्रेरणा, माजी दिग्गजाचा सल्ला
व्हिडिओ पाहा –