हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 चा पहिला सामना गमावला. 169 धावांचे लक्ष्य गाठताना मुंबई संघ 162 धावांवर सर्वबाद झाला. इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या लिलिवापूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून हार्दिक पंड्या याची निवड झाली. तेव्हापासूनच चाहत्यांमध्ये हार्दिकविषयीचा राग पाहायला मिळत आहे. रविवारी (24 मार्च) हंगामातील पहिला सामना संपल्यानंतर देखील चित्र बदलले नाही, असेच दिसते.
मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स (Mumbai Indians vs Gujarat Titans) या सामन्यातून दोन्ही संघांनी आपल्या आयपीएल हंगामाची सुरुवात केली. पाच वेळा मुंबई इंडियन्सला आयपीएल चॅम्पियन बनवणारा रोहित शर्मा (Rohit Sharma) यावर्षी हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वात खेळताना दिसत आहे. फ्रँचायझीने रोहितच्या जागी हार्दिकला संघाचा कर्णधार बनवल्याने चाहत्यांमध्ये मात्र प्रचंड नाराजी दिसत आहे. अष्टपैलू हार्दिकला याच पार्श्वभूमीवर टीका आणि ट्रोल्सला सामोरे जावे लागत आहे.
रविवारी मुंबई इंडियन्सचा कर्णधार सामन्यातील शेवटच्या षटकात बाद झाल्यानंतर संघाच्या विजयाच्या आशा मावळल्या. परिणामी चाहतेही चांगलेच निराश झालो हेते. त्यातती रोहितला कर्णधारपदावरून हटवल्याचा राग चाहत्यांच्या मनात होताच. हार्दिकने विकेट गमावल्यानंतर कर्णधार ड्रेसिंग रुममध्ये जात असताना त्याला चाहत्यांकडून डिवचण्यात आले. चाहते मागचा पुढचा विचार न करता हार्दिकला थेट ‘छपरी-छपरी’, असा आवाज देत होते. अष्टपैलूने मात्र यावर कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही.
Ahmedabad crowd calling Hardik Pandya ‘chhapri’ 😳 #ipl #HardikPandya #chapri #GTvMI pic.twitter.com/0QKEgHZrJY
— Lalit Kumar (@Lalit96L) March 25, 2024
उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर शेवटच्या षटकात विजयासाठी मुंबई इंडियन्सला 19 धावा हव्या होत्या आणि तीन विकेट्स संघाच्या हातात बाकी होत्या. षटकातील पहिल्या चेंडूवर हार्दिकने षटकार, तर दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला. उमेश यादव गोलंदाजी करत असल्याने त्याच्यावर तिसरा चेंडू टाकताना प्रचंड दबाव होता. पण तिसऱ्या चेंडूवर मोठा शॉट मारण्याच्या नादात हार्दिक झेलबाद झाला. चौथ्या चेंडूवर पियुष चावला यानेही विकेट गमावली. शेवटच्या दोन चेंडूवर शम्स मुलानी आणि आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. (The audience crossed the border while trolling Hardik! Directly said…)
महत्वाच्या बातम्या –
हिटमॅनकडून सर्वांना ‘हॅप्पी होळी!’, पाहा रोहित शर्माचा रंगांसोबत खेळतानाचा व्हिडिओ
हार्दिक पांड्या राशिद खानला घाबरला होता? माजी दिग्गजानं सांगितल्या मुंबईच्या कर्णधाराच्या दोन मोठ्या चुका