आपण आजपर्यंत क्रिकेट जगतात प्रत्येक खेळाडूंच्या वेगवेगळ्या स्टाईल्स पाहिल्या आहेत. यामध्ये भारतीय संघातील खेळाडूंचाही समावेश होतो. यापैकी एक म्हणजे सलामीवीर फलंदाज शिखर धवन. त्याच्या डोक्यावर कधीही केस दिसत नाहीत. तो त्याचे केस वाढवत नाही. हा प्रश्न सर्व चाहत्यांच्या मनात नेहमी उपस्थित होत असतो.
धवन (Shikhar Dhawan) आपल्या डोक्यावर केस का ठेवत नाही? याबद्दल कोणालाच माहिती नाही. परंतु इंस्टाग्रामवर झालेल्या चॅट दरम्यान धवनने याचा खुलासा केला आहे.
धवनने गुरुवारी (९ एप्रिल) इंस्टाग्राम लाईव्हच्या (Instagram Live Chat) माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला होता. या दरम्यान त्याने चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. तो चाहत्यांना म्हणाला की, जे विचारायचे आहे ते विचारा. यावेळी एका चाहत्याने धवनला प्रश्न विचारला की, “तू तुझ्या डोक्यावरील केस का वाढवत नाही?”
या प्रश्नाचे उत्तर देत धवन म्हणाला की, “मी केस वाढवत (Hair Style) नाही. कारण मी केस नसताना अधिक चांगला दिसतो. तसेच केस कमी असतील तर शांपूही कमी लागतो.”
आणखी एका चाहत्याने विचारले की, तू इतक्या चांगल्या प्रकारे फलंदाजी कशाप्रकारे करतो? या प्रश्नाला प्रत्युत्तर देत धवन म्हणाला की, “बॅटने.”
एका चाहत्याने त्याला त्याचा गब्बर हे नाव कोणी दिले असा प्रश्न विचारला. यावर धवन उत्तर देत म्हणाला की, “गब्बर हे नाव मला माझे रणजी प्रशिक्षक विजय दहिया (Vijay Dahiya) यांनी दिले आहे.
धवनने भारतीय संघाकडून ३४ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये कसोटीत त्याने ४०.६१ च्या सरासरीने २३१५ धावा केल्या आहेत. यामध्ये ७ शतके आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे.
तसेच त्याने १३६ वनडे सामने खेळले आहेत. त्यात त्याने ४५.१४ च्या सरासरीने ५६८८ धावा केल्या आहेत. याबरोबरच ६१ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात त्याने १५८८ धावा केल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-एका वर्षात सर्वाधिक वनडे धावा करणारे ५ खेळाडू






