---Advertisement---

कसोटी पदार्पणात सलग ३ शतके ठोकताना मोहम्मद अझरुद्दीनने वापरलेली बॅट निवडली होती ‘या’ खास व्यक्तीने

On: शनिवार, मे 22, 2021 6:09 PM
---Advertisement---

भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेकदा अफलातून खेळी केल्या आहेत. त्यातही त्यांचे कसोटी पदार्पण चांगलेच गाजले. विशेष म्हणजे त्यांनी कसोटी पदार्पणाच्या कसोटी मालिकेत केलेला विश्वविक्रम आजही अबाधित आहे. तो विश्वविक्रम म्हणजे कसोटी कारकिर्दीतील पहिल्या ३ सामन्यात सलग ३ शतक करण्याचा. या विक्रमावेळी वापरलेल्या बॅटबद्दल अझरुद्दीन यांनी नुकताच एक खुलासा केला आहे.

अझरुद्दीने यांनी एक खास ट्विट केले आहे, ज्यात त्यांनी कसोटी पदार्पणाच्या मालिकेत वापरलेल्या बॅटचा फोटो शेअर केला आहे. त्याचबरोबर त्यांनी लिहिले की ‘या बॅटने मी १९८४-८५ साली इंग्लंडविरुद्ध माझ्या पहिल्या तीन कसोटी सामन्यांत ३ सलग शतके करण्याचा विश्वविक्रम केला. त्या हंगामात मी याच बॅटने ८०० धावा केल्या होत्या. ही बॅट माझ्या आजोबांनी निवडली होती.’

या ट्विटमधून अझरुद्दीन यांनी खुलासा केला की त्यांनी कसोटी पदार्पणावेळी वापरलेली बॅट त्यांच्या आजोबांची निवड होती. विशेष म्हणजे अझरुद्दीन यांनी या बॅटचा फोटो शेअर केल्याने असेही समजत आहे की गेल्या ३ दशकांहून अधिक काळ ही बॅट अझरुद्दीन यांनी जपून ठेवली आहे.

सलग तीन कसोटी सामन्यात केली शतकी कामगिरी
भारत विरुद्ध इंग्लंड संघात ३१ डिसेंबर १९८४ ते ५ जानेवारी १९८५  या कालावधीत कोलकाताच्या इडन गार्डन स्टेडियमवर तिसरा कसोटी सामना झाला होता. या सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत अझरुद्दीन यांनी झुंजार शतकी खेळी केली होती. पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना ३२२ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने त्यांनी ११० धावा करत शतक ठोकले होते.

त्यानंतर मद्रास (आता चेन्नई) येथे अझरुद्दीन यांनी कारकिर्दीतील दुसरा कसोटी सामना खेळला होता. या सामन्यातही त्यांनी १०५ धावांची अफलातून खेळी केली होती. तर पुढील कानपुर येथे झालेल्या कारकिर्दीतील तिसऱ्या कसोटी सामन्यात त्यांनी १२२ धावा चोपल्या होत्या. अशाप्रकारे कसोटी कारकिर्दीतील पहिल्या ३ सामन्यात सलग ३ शतक जडणारे ते क्रिकेटजगतातील पहिले आणि एकमेव फलंदाज ठरले होते.

मोहम्मद अझरुद्दीन यांची कारकिर्द
अझरुद्दीन यांनी . ९९ कसोटी सामन्यांमध्ये ४५.३ च्या सरासरीने ६२१५ धावा त्यांनी केल्या. ज्यात २२ शतके आणि २ अर्धशतकांचा समावेश आहे. त्यांची सर्वाधिक धावसंख्या १९९ अशी आहे. तसेच वनडेत ३३४ सामने खेळले असून ७ शतके आणि ५८ अर्धशतकांसह ९३७८ धावा केल्या आहेत. तसेच क्षेत्ररक्षक म्हणून त्यांनी वनडे क्रिकेटमध्ये १५६ झेल घेतले होते.

अझरुद्दीन यांनी १९८७, १९९२, १९९६ आणि १९९६ या ४ वनडे विश्वचषकात भारतीय संघाचे प्रतिधिनित्व केले. विशेष म्हणजे यातील १९९२, १९९६ आणि १९९९ या तीन वनडे विश्वचषकात त्याने भारतीय संघाचे नेतृत्वही केले. तीन वनडे विश्वचषकात भारताचे नेतृत्व करणारे ते एकमेव कर्णधार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

बाबा नंबर १! वीकेंडला वॉर्नर असा करतो लाडक्या लेकींबरोबर मजा; पाहा बाप-लेकींचे गोड व्हिडिओ

क्या बात है! फलंदाजीत १५ षटकार, गोलंदाजीत लॅब्यूशेनची विकेट; ‘त्या’ ४५ वर्षीय क्रिकेटरचे आर अश्विनकडूनही कौतुक

एवढा कॉन्फिडन्स! इंग्लिश दिग्गजाची भविष्यवाणी, भारत-इंग्लंडमध्ये ‘हा’ संघ ५-०ने जिंकेल कसोटी मालिका

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---