---Advertisement---

एवढा कॉन्फिडन्स! इंग्लिश दिग्गजाची भविष्यवाणी, भारत-इंग्लंडमध्ये ‘हा’ संघ ५-०ने जिंकेल कसोटी मालिका

On: शनिवार, मे 22, 2021 3:09 PM
---Advertisement---

येत्या ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात भारतीय संघ इंग्लंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्यावर उभय संघात ५ सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. यापुर्वी इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर आला असताना यजमान भारताने पाहुण्या इंग्लंडला ३-१ ने कसोटी मालिकेत पराभवाची धूळ चारली होती. अशात यंदा इंग्लंडकडे मागील पराभवाचा वचपा काढण्याची संधी असणार आहे. या चुरसीच्या मालिकेपुर्वी आजी-माजी खेळाडूंनी विजेत्या संघाविषयी भविष्यवाणी करायला सुरुवात केली आहे. यात आता इंग्लंडचे माजी फिरकीपटू माँटी पानेसर यांनी उडी घेतली आहे.

ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात इंग्लंडच्या खेळपट्ट्या भारतीय फिरकीपटूंना मदत करतील. दुसरीकडे पुन्हा एकदा यजमान इंग्लंडच्या फलंदाजांच्या उणीवा दिसून येतील, असे पानेसर यांचे म्हणणे आहे. ते म्हणाले की, “ऑगस्टमध्ये जर खेळपट्टींवर चेंडूला वळण मिळाले तर भारताकडे ही कसोटी मालिका ५-० ने जिंकण्याची संधी असेल. तत्पुर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत हिरव्या खेळपट्टीची अपेक्षा करतो, जेणेकरुन इंग्लंड संघाची खोली लक्षात येईल.”

इंग्लंडची फलंदाजी कमकुवत
पानेसर यांनी इंग्लंड कसोटी संघाची फलंदाजी फळी कमजोर असल्याचे सांगितले आहे. कर्णधार जो रुटला वगळता इतर कोणताही फलंदाज अधिक प्रभावी कामगिरी करताना दिसलेला नाही. एकप्रकारे इंग्लंडचा संघ जो रुटवर निर्भर असल्याचे त्यांचे मत आहे. याबद्दल बोलताना पानेसर म्हणाले की, “जर जो रुट टिकला आणि त्याने मोठी खेळी केली; तर नक्कीच इंग्लंड संघ जिंकेल. परंतु रुटने एकट्यानेच सर्व धावा करण्याची अपेक्षा मला तरी नाही. ”

कसोटी मालिका – इंग्लंड विरुद्ध भारत
४-८ ऑगस्ट – पहिला कसोटी सामना, नॉटिंगघम
१२-१६ ऑगस्ट – दुसरा कसोटी सामना, लॉर्ड्स
२५-२९ ऑगस्ट – तिसरा कसोटी सामना, हेडिंग्ले
२-६ सप्टेंबर – चौथा कसोटी सामना, लंडन
१०-१४ सप्टेंबर – पाचवा कसोटी सामना, मँचेस्टर

महत्त्वाच्या बातम्या-

‘विराटसेना’साठी इंग्लंडकडून खुशखबर! क्वारंटाईन कालावधीत घट, सरावासही मिळणार जास्तीचा वेळ

विराटचा हुकमी एक्का म्हणतोय, “मी आज जे काही आहे त्यामध्ये माही भाईचा मोठा हात आहे”

टीम इंडियाला सापडली न्यूझीलंडची कमकुवत बाजू, WTC अंतिम सामन्यात उचलणार भरपूर फायदा!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---