भारतीय क्रिकेट संघ विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली उल्लेखनीय प्रदर्शन करताना दिसत आहे. आतापर्यंत विराट आणि कंपनीने अनेक ऐतिहासिक विजय नोंदवले आहेत. बऱ्याचशा युवा आणि प्रतिभाशाली खेळाडूंवर विश्वास दाखवत विराटने त्यांना संधी दिल्या आहेत. असे असले तरीही, भारतीय क्रिकेटपटू माजी कर्णधार एमएस धोनीच्या योगदानाला विसरलेले नाहीत. भारतीय संघ असो वा आयपीएल फ्रँचायझी, धोनीच्या नेतृत्त्वाखाली घडलेले क्रिकेटपटू आजही त्याची आठवण काढतात. यामध्ये २८ वर्षीय वेगवान गोलंदाज दीपक चाहर याची भर पडली आहे.
आपण आतापर्यंत जे काही साध्य केले आहे, त्यामध्ये ‘कॅप्टनकूल’ धोनीचा हात राहिला असल्याचे चाहरने म्हटले आहे. आयपीएलमध्ये धोनी कर्णधार असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळणारा चाहर टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाला की, “माही भाईच्या (एमएस धोनी) नेतृत्त्वाखाली खेळणे हे माझे स्वप्न होते आणि ते पूर्ण झाले आहे. मला त्याच्या देखरेखीखाली खेळताना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. त्याच्यामुळे माझ्या खेळाचा स्तर उंचावला आहे.”
“माही भाईने मला प्रत्येकवेळी पाठिंबा दिला आहे. आमच्या चेन्नई सुपर किंग्ज संघात एकही असा गोलंदाज नाही, ज्याने पावरप्लेमधील ३ षटके टाकली आहेत. परंतु धोनीमुळे मी एकटा तो कारनामा करु शकलो आहे. डावातील सुरुवातीची षटके टाकणे सोपे काम नसते. परंतु वेळेनुसार मी सुधारणा करत गेलो,” असे त्याने पुढे सांगितले.
धोनीचे कौतुक करताना चाहर पुढे म्हणाला की, “माही भाईला खूप चांगल्याप्रकारे माहिती आहे, कोणाचा कोणत्या ठिकाणी वापर केला पाहिजे. डेथ ओव्हर्समध्ये कोणता गोलंदाज सरस असेल, पावरप्लेसाठी कोण योद्य पर्याय ठरेल आणि मधल्या षटकात कोणाच्या हाती गोलंदाजी सोपवायची, हे सर्व त्याला माहिती असते.”
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियाला सापडली न्यूझीलंडची कमकुवत बाजू, WTC अंतिम सामन्यात उचलणार भरपूर फायदा!
“गाबा कसोटीत पुजारा भारतीय नव्हे तर ऑस्ट्रेलियन फलंदाजाप्रमाणे खेळला,” ऑसी सलामीवीराचे मोठे भाष्य
जेव्हा एकाच वेळी खेळले होते भारताचे दोन वेगवेगळे संघ, ‘अशी’ झाली होती गत; वाचा सविस्तर