---Advertisement---

जेव्हा एकाच वेळी खेळले होते भारताचे दोन वेगवेगळे संघ, ‘अशी’ झाली होती गत; वाचा सविस्तर

On: शनिवार, मे 22, 2021 12:42 PM
---Advertisement---

भारतीय पुरूष क्रिकेट संघ जून महिन्याच्या सुरुवातीला इंग्लंडसाठी रवाना होईल. या इंग्लंड दौऱ्यावर भारत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली सर्वप्रथम न्यूझीलंड विरुद्ध जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे. हा सामना १८ ते २२ जून दरम्यान खेळवला जाईल. त्यानंतर भारतीय संघाला ऑगस्ट महिन्यात इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. दरम्यान जुलै महिन्याचा रिकामा वेळ वाया न जावा म्हणून, बीसीसीआय प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत श्रीलंकेविरुद्ध श्रीलंकेत मर्यादित षटकांच्या मालिका खेळणार आहे. भारतीय क्रिकेटमध्ये यापूर्वी संघ वेगवेगळ्या ठिकाणी केवळ एकदाच खेळले आहेत.

यावर्षी खेळलेले दोन संघ
सन १९९८ मध्ये दोन भारतीय संघ वेगवेगळ्या ठिकाणी खेळताना दिसलेले. क्वाललंपूर येथे राष्ट्रकुल स्पर्धा व टोरंटो येथे पाकिस्तान विरुद्ध सहारा कप या स्पर्धा एकाच वेळी खेळवल्या जात होत्या. भारतीय संघाचा नियमित कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वात एक संघ सहारा कप खेळण्यासाठी पाठवण्यात आला. यासंघात राहुल द्रविड, सौरव गांगुली, जवागल श्रीनाथ व व्यंकटेश प्रसाद यांचा समावेश होता. तर, राष्ट्रकुल स्पर्धेसाठी अजय जडेजा यांच्या नेतृत्वात पाठवलेल्या संघात अनिल कुंबळे, व्हीव्हीएस लक्ष्मण व सचिन तेंडुलकर हे खेळाडू होते. बीसीसीआयचा हा दोन संघ पाठवण्याचा निर्णय मात्र पूर्णपणे फसला होता.

दोन्हीकडे ठरला भारत अपयशी
राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये एकूण १६ संघांनी भाग घेतलेला. अँटीगा, ऑस्ट्रेलिया व कॅनडासह भारत ब गटात सामील होता. ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केले तर भारतीय संघाने कॅनडाचा पराभव केला. अँटीगा विरुद्धच्या सामन्याचा निकाल लागला नाही व भारत गट फेरीतच बाद झाला. यानंतर भारतीय संघाचे काही खेळाडू सहारा कप खेळण्यासाठी पाठवले गेले.

तोपर्यंत भारत मालिकेत २-१ अशा पिछाडीवर होता. सचिन, कुंबळे, रॉबिन सिंग व अजय जडेजा हे खेळाडू या मालिकेसाठी संघात सहभागी होतील असे बीसीसीआयने म्हटलेले. ज्याला पाकिस्तानने विरोध केला. तरीही जडेजा चौथ्या सामन्यात खेळला.

बऱ्याच वादानंतर संघात सामील झालेल्या सचिनबद्दल काहीही माहिती मिळत नव्हती. तो कुटुंबासोबत खंडाळ्याला गेल्याचे समजले. सचिन पाचव्या सामन्यासाठी उपलब्ध झाला. तोपर्यंत पाकिस्तानने मालिकेत ३-१ अशी आघाडी मिळवलेली. अखेरच्या सामन्यात सचिनने ७७ तर कर्णधार अझरुद्दीनने शतकी खेळी केली. मात्र, आमीर सोहेलने केलेल्या ९७ धावांच्या जोरावर पाकिस्तानने हा सामना आपल्या नावे करून ४-१ ने मालिका जिंकली.

महत्त्वाच्या बातम्या-

भारतीय खेळाडूने ‘केरळ एक्सप्रेस’ श्रीसंतची कपिल देव आणि मोहम्मद शमीशी केली तुलना, पण का?

जेव्हा राहुल द्रविडचा टी२०त पाहायला मिळाला होता ‘रुद्रावतार’, मारले होते सलग ३ गगनचुंबी षटकार

द्रविडच्या प्रशिक्षणाखाली भारताचा १-३ने झाला होता दारुण पराभव, श्रीलंका दौऱ्यावर बदलणार नकोसं चित्र?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---