---Advertisement---

आयपीएलमधील प्रत्येक चेंडूमागे बीसीसीआयला मिळतात 23. 3 लाख रुपये

On: शनिवार, मे 19, 2018 6:37 PM
---Advertisement---

आयपीएल २०१८ आता शेवटच्या टप्यात आली आह त्यामुळे ही स्पर्धा आणखीच रंगतदार होत आहे. आयपीएलने आजपर्यंत अनेक खेळाडूंना करोडपती केले आहे.

त्याचबरोबर आयपीएलमुळे बीसीसीआयचाही चांगलाच फायदा झाला आहे. क्रिकेटमध्ये सर्वात श्रीमंत संघटनेत बीसीसीआयचे नाव घेतले जाते.

बीसीसीआयला सर्वात श्रीमंत संघटना बनवण्यात आयपीएलने मोठी भूमिका बजावली आहे. सध्या बीसीसीआयला आयपीएलमधील सामन्यात प्रत्येक चेंडूमागे 23. 3 लाख रुपये मिळत आहेत.

या हिशोबाने जर सामन्याचा विचार केला तर बीसीसीआय प्रत्येक सामन्यामागे जवळजवळ 55 कोटी रुपये कमावत आहे. यामुळे सर्वाधिक कमाई करणाऱ्या लीग स्पर्धांमध्ये आयपीएल दुसऱ्या स्थानावर आहे.

यामध्ये अव्वल स्थानावर इंग्लिश प्रीमियर लीग आहे. या स्पर्धेच्या प्रत्येक सामन्यामागे 84 कोटी मिळतात. तसेच या यादीत एनबीए तिसऱ्या स्थानावर आहेत. त्यांना प्रत्येक सामन्यामागे 18 कोटी मिळतात.

महत्त्वाच्या बातम्या-

पहा व्हिडिओ- मांजरीने घातला चालु सामन्यातच धुमाकूळ

क्रिकेट सामन्यादरम्यान झालेल्या स्फोटात ८ जण ठार

-म्हणून आजच्या दोन्ही आयपीएल सामन्यांना आहे महत्त्व!

या दोन संघांना आयपीएलमध्ये पडले आहेत षटकारांचे सर्वाधिक फटके

मुंबई नाही तर या दोन संघांनी आयपीएलमध्ये केली आहे षटकारांची बरसात

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment