आज भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक अनिल कुंबळेने राजीनामा दिल्यावर भारतीय क्रिकेट बोर्डाने अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यात कुंबळेच्या राजीनाम्याचं कोणतही कारण दिल गेलं नाही.
परंतु या प्रसिद्धी पत्रकातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की सचिन, लक्ष्मण आणि गांगुलीच्या क्रिकेट सल्लागार कमिटीने कुंबळेला कार्यकाळ वाढविला होता परंतु कुंबळेने त्याला नकार दिला आहे.
काय आहे बीसीसीआयच्या प्रसिद्धी पत्रकात
भारतीय वरिष्ठ क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदावरून अनिल कुंबळे यांनी राजीनामा दिला आहे. क्रिकेट सल्लागार कमिटीने कुंबळेचा प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ वाढवला होता. परंतु अनिल कुंबळे यांनी यासाठी नकार दिला.
UPDATE: Mr. Anil Kumble withdraws from the post of Head Coach of the Indian Cricket Team. https://t.co/LJB5OOchjv
— BCCI (@BCCI) June 20, 2017
याबरोबर बीसीसीयने एमव्ही श्रीधर यांची वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम मॅनेजर म्हणून नियुक्ती केली आहे. एमव्ही श्रीधर हे हैद्राबादकडून १९८८ ते २००० या काळात क्रिकेट खेळले आहेत. १२ वर्षांच्या देशांतर्गत क्रिकेटच्या कारकिर्दीत त्यांनी ९७ फर्स्ट क्लास सामने तर ३५ लिस्ट अचे सामने खेळले आहेत.
The BCCI has deputed Dr. MV Sridhar, GM – Cricket Operations to supervise the Team Management for the West Indies tour.
— BCCI (@BCCI) June 20, 2017
तर संजय बांगर फलंदाजी प्रशिक्षक म्हणून तर आर श्रीधर क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून आपलं काम सुरु ठेवतील तसेच वेळोवेळी टीमला मार्दर्शन करतील.
Mr. Sanjay Bangar, Batting Coach & Mr. R Sridhar, Fielding Coach will continue their assignments and assist the Indian Cricket Team.
— BCCI (@BCCI) June 20, 2017