भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील वाढत्या तणावामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) एक आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. पण उर्वरित सामान्यांबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.
ईएसपीएनक्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार बीसीसीआयने (BCCI) आयपीएल 2025 च्या उर्वरित 16 सामन्यांचे आयोजन करण्यासाठी बेंगलोर, चेन्नई आणि हैदराबाद ही 3 ठिकाणे निवडली आहेत.
???? IPL 2025 RESUMPTION. ????
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 10, 2025
– The BCCI has shortlisted Bengaluru, Chennai and Hyderabad as the 3 venues to host the remaining 16 matches of IPL 2025. (Espncricinfo). pic.twitter.com/NtVyUIlXXn
बीसीसीआयने शुक्रवारी (9 मे) लीग स्थगितीची घोषणा केली असली तरी, आयपीएल 2025 पुन्हा सुरू करण्याबाबत बोर्डाने निर्णय घेण्यासाठी वेळ निश्चित केला आहे की नाही? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही.
जेव्हा बीसीसीआयने आयपीएल 2025 स्थगित करण्याची घोषणा केली, तेव्हा पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स (PBKS vs DC) यांच्यातील 74 पैकी 58 सामना पहिल्या डावाच्या 11 व्या षटकात रद्द करण्यात आला.
सामना पुन्हा खेळवला जाईल की “नो रिझल्ट” म्हणून घोषित केला जाईल याबद्दल कोणतीही पुष्टी झालेली नाही, ज्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. लीग पुन्हा सुरू झाल्यास 16 सामने खेळायचे आहेत, त्यापैकी 12 सामने आयपीएल 2025 प्लेऑफ आणि अंतिम फेरीत जाण्यापूर्वी लीग सामने आहेत.
हैदराबादला मूळ पहिला क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामना आयोजित करण्याची संधी देण्यात आली होती, तर कोलकाताला दुसऱ्या क्वालिफायर आणि फायनल सामन्याचे यजमानपद मिळाले. पण आता आयपीएल 2025 साठी बीसीसीआयचा प्लॅन बी काय आहे हे पाहणे बाकी आहे.






