आगामी टी२० विश्वचषक ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरमध्ये यूएई आणि ओमानमध्ये खेळवला जाणार असून विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकाची जागा मोकळी होणार आहे. त्यानंतर शास्त्री या पदावर कायम राहण्यासाठी इच्छुक दिसत नाहीत. मागच्या बऱ्याच दिवसांपासून असा प्रश्न उपस्थित होत आहे की, शास्त्रीनंतर संघाचा मुख्य प्रशिक्षक कोण असेल? अशातच आता अशी माहिती सामोर येत आहे की, बीसीसीआय या पदासाठी अनिल कुंबळे आणि वीवीएस लक्ष्मण यांच्या नावाचा विचार करत आहे.
कुंबळे यापूर्वीही भारतीय संघचे मुख्य प्रशिक्षक राहिले आहेत. मात्र, भारतीय कर्णधार विराट कोहलीशी त्यांचा वादामुळे त्यांनी त्यावेळी पदाचा राजीनामा दिला होता.
याबाबद बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला माहिती दिली आहे. तो म्हणाला, “अनिल कुंबळे ज्याप्रकारे बाहेर गेले होते त्यामध्ये आता सुधार करण्याची गरज आहे. ज्याप्रकारे कोहलीच्या दबावात येऊन सीओकेने त्यांना हटवले, ते एक चांगले उदाहरण नव्हते. असे असले तरीही, हे कुंबळे आणि लक्ष्मणवरही अवलंबून असेल की, ते या पदासाठी अर्ज करू इच्छितात की नाही?”
बीसीसीआय या दोघांना प्रशिक्षकपदासाठी अर्ज करायला लावू शकते. यापूर्वी कुंबळे २०१६ मध्ये भारतीय संघाचा प्रशिक्षक झाला होता. पण विराटसोबत त्याचे संबंध खराब झाल्यामुळे त्याने पदाचा राजीनामा दिला होता. पण आता असे सांगितले जात आहे की, कुंबळेंचे नाव मुख्य प्रशिक्षक बनण्यासाठी सर्वात पूढे आहे. पण लक्ष्मणच्या नावावरही विचार केला जाऊ शकतो. लक्ष्मण आयपीएल संघ सनरायझर्स हैदराबादचा मार्गदर्शक आहे. त्याच्याकडे खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचा चांगला अनुभवही आहे.
रवी शास्त्री मुख्य प्रशिक्षक असताना भारतीय संघाने चांगली कामगिरी केलेली आहे. संघाने फक्त मायदेशातच नाही तर विदेशातही अनेक सामने आणि मालिका जिंकल्या आहेत. शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला २ कसोटी मालिकेत त्यांच्याच देशात हरवले आहे. तसेच यावर्षी इंग्लंविरुद्धच्या कसोटी मालिकेतही भारतीय संघाने चांगेल प्रदर्शन केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनात भारतीय संघाने २०१९ मध्ये विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली होती. तसेच जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यापर्यंतही संघ पोहोचला होता. मात्र, संघाला अंतिम सामन्यात न्यूझीलँडविरुद्ध पराभव मिळाला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
‘टी२०चे नेतृत्त्वपद सोडल्यानंतरही एका संघाप्रमाणे काम करतील विराट-रोहित’, पाक क्रिकेटरचा दावा
आयपीएल २०२१ मध्ये ऑरेंज कॅप जिंकण्यासाठी ‘हे’ ३ खेळाडू आहेत प्रमुख दावेदार, पाहा नावे