भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्या सुरक्षेत वाढ केली गेली आहे. गांगुलीला आधीपासून वाय श्रेणीच्या सुरक्षा आहे. आता यात वाढ करून त्यांची सुरक्षा झेट श्रेणीची केली गेली आहे. बंगाल सरकारने हा निर्णय घेतल्याचे समोर येत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार गांगुलींनी आपल्या सुरक्षेत कुठल्याही पद्धतीची सुधारण हवी आहे, अशी मागणी केली नव्हती. पण तरीदेखील बंगाल सरकारने हा निर्णय घेतल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे म्हणजेच बीसीसीआयचे अध्यक्ष राहिलेल्या सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांची सुरक्षा वाढवण्यामागचे कारण अद्याव अस्पष्टच आहे. गांगुलींच्या सुरक्षेला काही धोका आहे का? अशी शंका सध्या चाहत्यांमध्ये व्यक्त केली जाऊ लागली आहे. गांगुली सध्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या सपोर्ट स्टाफचा भाग आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या क्रिकेट डायरेक्टरची भूमिका गांगुली बजावत आहेत. असे असले तरी, त्यांचा संघ आयपीएल 2023च्या प्लेऑफमध्ये पोहोचू शकणार नाहीये. कारण हंगामातील सुरुवातीच्या 12 पैकी फक्त चार सामन्यांमध्ये दिल्लीला विजय मिळाला आहे.
दरम्यान, मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सौरव गांगुलींनी बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडले. त्याआधी गांगुली आणि केंद्र सरकारमधील संबंध जवळचे मानले जात होते. सत्ताधारी पक्षाकडून गांगुलींना पक्षप्रवेशाचा प्रस्तान दिला गेला होता, असेही सांगितले जाते. मात्र, गांगुलींनी हा प्रस्ताव मान्य केला नाही. त्यानंतर गांगुलींना बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडावे लागल्याचे पाहायला मिळाले. अशातच आता बंगाल सरकारकडून त्यांना झेड श्रेणीची सुरक्षा दिली गेल्यामुळे या सर्व गोष्टींना राजकीय वळण येतान दिसत आहे. (The Bengal government has upgraded Sourav Ganguly’s security to Z category)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘ती’ घटना घडताच मुंबईच्या चाहत्यांचा जीव पडला भांड्यात, जमिनीवर कोसळताच नवीन ‘पोलार्ड’ दुखापतग्रस्त
‘हे प्रदर्शन त्यांच्यासाठीच…’, विजयाच्या एक दिवस आधीपर्यंत आयसीयूत होते मोहसिनचे वडील