---Advertisement---

अश्विनच्या निवृत्तीनंतर बीसीसीआयने शेअर केला एक खास व्हिडिओ! अश्विन म्हणाला, “आयुष्य ही खरोखरच…”

Ravichandran Ashwin
---Advertisement---

भारताचा दिग्गज फिरकीपटू ‘रविचंद्रन अश्विन’ने (Ravichandran Ashwin) आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. गाबा कसोटी संपल्यानंतर अश्विनने निवृत्ती जाहीर केली. आता अश्विनच्या निवृत्तीनंतर, ‘बीसीसीआय’ने (BCCI) एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अश्विनने आयुष्याबद्दल सांगितले आहे. अश्विन म्हणाला की, जीवन ही शर्यत नाही.

बीसीसीआयने एक मोठा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये अश्विनने आयुष्यातील अनेक गोष्टींबद्दल सांगितले. व्हिडिओच्या सुरुवातीला अश्विन म्हणाला, “माझ्यासाठी आयुष्य आणि कसोटी क्रिकेटमध्ये खूप साम्य आहे. आर अश्विन ऑर्गेनिक आहे.” तो पुढे म्हणाला, “शेन वॉर्न म्हणाला होता की, चांगले क्रिकेटपटू, खूप चांगले क्रिकेटपटू त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत 30-40 टक्के यश मिळवतात. मी म्हणेन की खेळातील सर्वात मोठा ब्रेक हा खेळातच होता.”

अश्विन पुढे म्हणाला, “आयुष्य ही खरोखरच शर्यत नाही. हे जीवन आपल्या स्वतःच्या अटींवर जगणे आणि आपण जे मिळवले किंवा अपयशी ठरले त्याबद्दल आनंदी राहणे आहे. जेव्हा मी माझ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली तेव्हा मला माहित नव्हते की मी 100 कसोटी सामने खेळणार आहे.”

आर अश्विनने 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आपल्या कारकिर्दीत 106 कसोटी, 116 एकदिवसीय आणि 65 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. 200 कसोटी डावांमध्ये अश्विनने 24.00च्या सरासरीने 537 विकेट्स आपल्या नावावर केल्या, तसेच 151 डावांमध्ये 25.75च्या सरासरीने 3,503 धावा केल्या. दरम्यान त्याने 6 शतकांसह 14 अर्धशतके झळकावली.

याशिवाय एकदिवसीय सामन्यांच्या 114 डावांमध्ये 33.20च्या सरासरीने अश्विनने 156 विकेट्स घेतल्या आणि 63 डावात फलंदाजी करताना 707 धावा केल्या. गोलंदाजीतील त्याचा सर्वोत्तम आकडा 4/25 होता. टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 65 डावांमध्ये भारतीय फिरकीपटूने 23.22च्या सरासरीने 72 विकेट्स घेतल्या आणि 19 डावात फलंदाजी करताना एकूण 184 धावा केल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

‘त्याच्या निर्णयावर खूप…’, आर अश्विनच्या निवृत्तीवर रोहित शर्माची प्रतिक्रिया
अश्विनच्या निवृत्तीवर माजी क्रिकेटपटूंनी आश्चर्य व्यक्त केलं, गंभीर-रोहित जोडीवर प्रश्न उपस्थित
IND vs AUS; चौथ्या कसोटीत नाही खेळणार ट्रेविस हेड? दुखापतीबद्दल म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---