सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने ९ गडी राखून मोठा विजय मिळवला . या सामन्यापूर्वी सनरायझर्स हैदराबाद संघाने खेळलेल्या तीनही सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तर दुसरीकडे पंजाब संघाचा सलग तिसऱ्या सामन्यात पराभव झाला आहे. हा सामना जिंकल्यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार डेविड वॉर्नर याने, आपल्या संघातील अष्टपैलू खेळाडू अभिषेक शर्मा बद्दल एक खुलासा केला.
पंजाब किंग्ज संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार केएल राहुलने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पंजाब किंग्ज संघाकडून केएल राहुल आणि मयंक अगरवाल यांची जोडी मैदानात आली होती. तर डेविड वॉर्नरने गोलंदाजीची सुरुवात अभिषेक शर्माकडून करून घेतली होती. हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले होते. इतकेच काय तर गोलंदाजाला ही आश्चर्य वाटले होते. कारण सामना सुरू होण्यापूर्वी गोलंदाजांना अशी कल्पना दिली जाते की, पहिले षटक कोण टाकणार आहे. परंतु त्याला कल्पना नसताना डेविड वॉर्नरने पहिले षटक टाकण्यासाठी बोलवले होते.
यामागील कारण असे ही होते की, चेन्नईच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांचा बोलबाला असतो. या षटकात त्याने कर्णधाराला निराश केले नाही. त्याने अवघ्या ३ धावा दिल्या. यासोबतच एका चेंडूवर त्याला मयंक अगरवालला बाद करण्याची संधी मिळाली होती. मयंकने हवेत शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु तो झेल राशिद खानकडून सुटला होता. त्याने ४ षटक गोलंदाजी करत २४ धावा दिल्या होत्या. यात त्याने २ गडी बाद केले होते.
सामन्यानंतर डेविड वॉर्नर म्हणाला, “जेव्हा आम्ही क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानात उतरलो तेव्हा अभिषेकला कल्पना नव्हती की, त्याला पाहिले षटक टाकायचे आहे. मला त्याला सांगायचे नव्हते, कारण मी त्याला असे सांगितले असते तर त्याने या गोष्टीचा विचार करायला सुरुवात केली असती.”
या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु हा निर्णय फसला. कारण संघातील मुख्य फलंदाजांना धावा करण्यात अपयश आले होते. या संघाकडून मयंक अगरवाल याने २२ धावा केल्या तर शाहरुख खानने देखील २२ धावा केल्या होत्या. याव्यिरिक्त कोणाला ही साजेशी कामगिरी करण्यास यश आले नाही. पंजाब संघाने १९.४ षटकात सर्वबाद १२० धावा केल्या होत्या.
या धावांचा पाठलाग करताना हैदराबाद संघाकडून आलेले सलामी फलंदाज डेविड वॉर्नर याने ३७ धावा केल्या तर बेअरस्टोने नाबाद ६३ धावांची खेळी केली होती. यासोबतच आयपीएल २०२१ स्पर्धेत आपला पहिला सामना खेळत असलेल्या विलियम्सनने नाबाद १६ धावा केल्या. हैदराबाद संघाने १८.४ हे आव्हान पूर्ण केले.
महत्त्वाच्या बातम्या –
शारजातील सचिनच्या ‘त्या’ वादळी खेळीवेळीची आयसीसी वनडे क्रमवारी
सचिन जेव्हा शारजात शानदार खेळला तेव्हा त्याचा सीव्ही कसा होता?
आठ वर्षात जमले नाही ते धोनीने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात केले, पाहा चक्रावून टाकणार रेकॉर्ड