---Advertisement---

गोलंदाज करत असलेल्या ‘या’ चूकीवर भडकले सुनील गावसकर; म्हणाले…

On: गुरूवार, एप्रिल 22, 2021 5:40 PM
---Advertisement---

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. एखाद्या संघाने जर एका सामन्यात विजय मिळवला तर पुढच्या सामन्यात त्या संघाला पराभवही पत्करावा लागू शकतो. त्याचप्रमाणे खेळाडूंच्या कामगिरीबाबतही होते. परंतु आयपीएल 2021 च्या हंगामात अनेक सामन्यात गोलंदाज एकच चूक सारखी करताना दिसत आहे, ती चूक म्हणजे नो बॉल टाकणे. त्यामुळे या चूकीबद्दल भारताचे माजी महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आयपीएल 2021 चा 15 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला या सामन्यात नाणेफेक जिंकून केकेआरने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला यामध्ये 12 व्या षटकांत गोलंदाजी करत असलेल्या प्रसिद्ध कृष्णाने एका षटकांत दोन नो बॉल टाकले.

त्यामुळे प्रसिद्ध कृष्णाने टाकलेल्या या नो बॉलवरती सुनील गावस्करांनी नाराजी व्यक्त करत गोलंदाज प्रोफेशनल असल्याने त्याने नो बॉल टाकू नये असे म्हटले आहे. या अगोदरच दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध मुंबई इंडियन्स या सामन्यातील 19 व्या षटकांत भारताचा आणि मुंबई इंडियन्सचा सर्वोत्तम गोलंदाज जसप्रित बुमराहने सुद्धा एका षटकांत दोन नो बॉल टाकले होते.

आयपीएल 2021 मध्ये पहिल्या सामन्यात पराभवाचे तोंड पाहिलेल्या चेन्नई सुपर किंग्जने पुढील तीन सामन्यात चमकदार कामगिरी केली. बुधवारी (21 एप्रिल) रोजी खेळल्या गेलेल्या कोलकाता विरूद्धच्या सामन्यात चेन्नईने आपल्या खेळीचे चांगले प्रदर्शन केले. या सामन्यात ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिसच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर सीएसकेने 20 षटकांत एकूण 220 धावा केल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या कोलकता संघातील पहिल्या पाच फलंदाजांना दुहेरी आकडा सुद्धा गाठता न आल्याने 18 धावांनी त्यांना पराभवाचे तोंड पहावे लागले.

महत्त्वाच्या बातम्या –

“आरसीबीमध्ये सामील झालेल्या पहिल्या दिवसापासून वाटते की मी माझ्या घरात आहे”, दिग्गज खेळाडूची प्रतिक्रिया 

पहिल्याच षटकात गोलंदाजी करण्याची ‘त्याला’ नव्हती कल्पना, वॉर्नरने योजनेमागील सांगितले अजब कारण

शारजातील सचिनच्या ‘त्या’ वादळी खेळीवेळीची आयसीसी वनडे क्रमवारी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---