---Advertisement---

केकेआरविरुद्ध मैदानात उतरण्यापूर्वी धोनीने गोलंदाजांना दिला होता ‘हा’ कानमंत्र, स्वतः केला खुलासा

On: गुरूवार, एप्रिल 22, 2021 5:58 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगमध्ये बुधवारी (२१ एप्रिल) दोन सामने खेळवले गेले. दिवसातील दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) व कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) समोरासमोर आले. या सामन्यात सीएसकेने दर्जेदार खेळाचे प्रदर्शन करत केकेआरचा १८ धावांनी दारूण पराभव केला. या सामन्यातील विजयानंतर सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीने गोलंदाजीला उतरण्यापूर्वी गोलंदाजांना दिलेल्या सल्ल्याचा उलगडा केला.

गोलंदाजांना दिला होता हा सल्ला
फाफ डू प्लेसिस व ऋतुराज गायकवाड या सलामीवीरांच्या अर्धशतकांच्या जोरावर सीएसकेने २२१ धावांचे आव्हान केकेआरसमोर ठेवले. मात्र, गोलंदाजीला उतरण्यापूर्वी धोनीने आपल्या गोलंदाजांना महत्त्वपूर्ण सल्ला दिला होता. त्याचा उलगडा धोनीने सामन्यानंतर पारितोषिक वितरण समारंभात केला.

धोनी म्हणाला, “मला वाटते की अशा प्रकारच्या सामन्यात कर्णधार म्हणून काम पाहणे सोपे असते. कारण १५ व्या ते १६ व्या षटकानंतर सामना वेगवान गोलंदाज आणि फलंदाज यांच्यात असतो. जिंकलेल्या संघाने कदाचित रणनीती चांगली अंमलात आणली. परंतु, २० षटके पूर्ण झाली असती तर, सामना आणखी जवळ गेला असता. विरोधी संघाचा आदर करणे देखील महत्त्वाचे आहे.”

धोनीने यानंतर युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड, फाफ डू प्लेसीस आणि दीपक चाहर यांचेदेखील कौतुक केले.

अटीतटीच्या सामन्यात चेन्नईचा विजय
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सीएसकेचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड (६४) आणि फाफ डू प्लेसिस (नाबाद ९५) यांच्या अप्रतिम फलंदाजीच्या जोरावर ३ बाद २२० धावा धावफलकावर लावल्या. प्रत्युत्तरात, वेगवान गोलंदाज दीपक चाहरने पहिल्या ५ षटकात ४ बळी मिळवून केकेआरची अवस्था पाच बाद ३१ अशी केली होती. मात्र, त्यानंतर आंद्रे रसेलने २२ चेंडूत ५४ आणि पॅट कमिन्सने ३४ चेंडूत नाबाद ६६ धावा बनवून सामना रंगतदार बनविला. मात्र, तो संघाला विजयी करू शकला नाही. सामनावीर पुरस्कार फाफ डू प्लेसीसला देण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या – 

गोलंदाज करत असलेल्या ‘या’ चूकीवर भडकले सुनील गावसकर; म्हणाले…

“आरसीबीमध्ये सामील झालेल्या पहिल्या दिवसापासून वाटते की मी माझ्या घरात आहे”, दिग्गज खेळाडूची प्रतिक्रिया 

पहिल्याच षटकात गोलंदाजी करण्याची ‘त्याला’ नव्हती कल्पना, वॉर्नरने योजनेमागील सांगितले अजब कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---