fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

ज्या गोलंदाजाला रोहितने धु-धु धुतले, तो आता अमेरिकेकडून खेळणार क्रिकेट

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात दक्षिण आफ्रिका संघ भारत दौऱ्यावर आला होता. त्यावेळी रांची येथे कसोटी सामन्यादरम्यान रोहित शर्माने चमकदार कामगिरी केली होती. यावेळी रोहितने पहिल्याच डावात २१२ धावा केल्या होत्या. यामध्ये रोहितने दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेन पीटच्या गोलंदाजीवर सर्वाधिक धावा केल्या होत्या.

पीटने १८ षटकांमध्ये १०१ धावा दिल्या होत्या. पीटचा (Dane Piedt) हा दक्षिण आफ्रिकेकडून खेळलेला शेवटचा सामना होता. त्याने आता आयसीसीचा एलिट सदस्य देश दक्षिण आफ्रिकेला (South Africa) निरोप दिला आहे. तसेच तो आता अमेरिकेकडून (America) खेळण्याची तयारी करत आहे.

पीट आता अमेरिकेत स्थायिक होणार आहे. अमेरिकेसारख्या आयसीसीच्या असोसियट देशाला एक दिवस विश्वचषकात पाहण्याचे त्याचे स्वप्न आहे.

दक्षिण आफ्रिकेकडून ९ कसोटी सामने खेळणारा पीट पुढील काही महिन्यात अमेरिकेत जाईल. इथे तो मायनर लीग टी२० स्पर्धा (Minor League T20 Tournament) खेळणार आहे.

ईएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत पीटने सांगितले की, “अमेरिकेला मागील वर्षी वनडे संघाचा दर्जा मिळाला आहे. मी सकाळी करार केला आहे. परंतु मी तिथे कधी जाईल हे मलाच माहिती नाही. आर्थिक आणि जीवनशैलीच्या कारणास्तव मी या ऑफरला नकार देऊ शकलो नाही. परंतु हा एक कठीण निर्णय होता.”

यावेळी तो म्हणाला की, नजीकच्या काळात दक्षिण आफ्रिका संघात स्थान मिळण्याची शक्यता खूप कमी असल्याचे त्याने सांंगितले. त्याच्या या निर्णयामागील हेही एक कारण आहे.

पीटने २०१४मध्ये झिंबाब्वेविरुद्धच्या (Zimbabwe) कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते. परंतु त्याला खास कामगिरी करता आली नाही. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ ९ कसोटी सामने खेळले आहेत. दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना आपल्या लहान कारकीर्दीत त्याने केवळ २६ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने एका डावात ३ वेळा ४ विकेट्स घेतल्या आहेत. तर एका डावात ५ विकेट्स घेण्याचा कारनामा त्याने १ वेळा केला आहे.

ट्रेंडिंग घडामोडी-

-मुंबई क्रिकेट सफरनामा भाग- २: मुंबईत कसोटीचे आगमन आणि स्वातंत्र्यपूर्व क्रिकेट

-कमी कसोटी सामने खेळूनही २००० पासून १४ कर्णधार पाहिलेले दोन संघ

-आयपीएलमध्ये सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेणारे ३ क्रिकेटर्स

You might also like