टी20 विश्वचषक 2024 आता साखळी सामन्यांच्या अंतिम टप्यात आहे. भारत, अफगाणिस्तान, अमेरिका, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाचे संघ सुपर-8 मध्ये पोहोचले आहेत. आणखी दोन संघांना अजून पुढच्या फेरीत जायचे आहे. तर पाकिस्तान, न्यूझीलंड आणि श्रीलंकासारखे मोठे संघ सुपर-8 मध्ये पात्र ठरु शकले नाहीत. पाकिस्तान संघाला साखळी फेरीत अमेरिका आणि भारताकडून पराभव पत्करावा लागला. टी20 विशवचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच पागकिस्तान साखळी फेरीतून बाहेर पडला आहे. बाबर आझमच्या संघाला माजी पकिस्तानी क्रिकेटपटूंनी खेळाडूंच्या कामगिरीवर सडेतोड टीका केली आहे. आश्या स्थितीत संघाची खराब कामगिरी लक्षात घेता आता 3 खेळाडूंची कारकीर्द संपल्याचे मानले जात आहे. कदाचित त्यांना पुन्हा संघात संधी मिळेलही.
1- आझम खान
अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज मोईन खानचा मुलगा आझम खान खराब फॉर्मशी झुंजताना दिसला. विकेटकीपिंगमध्येही तो अप्रतिम काही कामगिरी दाखवू शकला नाही. त्याच्या वजन आणि बॉडी शेपबाबतही त्याची खूप खिल्ली उडवली जात होती. विश्वचषकातील खराब कामगिरीमुळे त्याच्यावर जगभरातून टीका झाली होती. अशा परिस्थितीत आझम खान पुन्हा पाकिस्तान संघात परत येऊ शकणार नाहीत.
२- इमाद वसीम
टी20 विश्वचषकापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला फिरकी अष्टपैलू इमाद वसीम 2024 च्या टी20 विश्वचषकात पूर्णपणे निस्तेज दिसत होता. भारताविरुद्ध इमादने लज्जास्पद कामगिरी केली. अनेक माजी दिग्गजांनीही इमादच्या जागेवर प्रश्न उपस्थित केले होते. टी-20 विश्वचषकात पाकिस्तानच्या अशा कामगिरीनंतर आता इमादसाठी पुन्हा पाकिस्तानकडून खेळणे कठीण मानले जात आहे.
3- मोहम्मद आमिर
डावखुरा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरने 2024 टी20 विश्वचषकापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र, त्याचे पुनरागमन अपेक्षेप्रमाणे झाले नाही. जरी आमिरने भारताविरुद्ध चांगली गोलंदाजी केली होती, तरीही त्याने यूएसए विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये 18 धावा दिल्या, ज्यामध्ये अनेक अतिरिक्त धावांचा समावेश होता. सुपर ओव्हरमध्ये आमिरने तीन वाईड बॉल टाकले, ज्यावर अमेरिकेचे फलंदाज धावले आणि धावा केल्या. आता पाकिस्तान लीग स्टेजमधून बाहेर पडल्यामुळे आमिरसाठी पुन्हा पाकिस्तानकडून खेळणे खूप कठीण मानले जात आहे.
महत्तवाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकादरम्यान दिग्गज खेळाडूनं घेतली निवृत्ती, दोन देशांकडून खेळला आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट
नामिबियाला हरवूनही इंग्लंडच्या डोक्यावर टांगती तलवार, आता फक्त ऑस्ट्रेलियाच वाचवू शकते
भारत विरुद्ध कॅनडा सामना पावसामुळे वाया गेल्यानं सुनिल गावसकर भडकले