Monday, May 16, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पोराची बातच न्यारी! थेट चालू सामन्यातच स्कूटर घेऊन घुसला मैदानात, पाहायला मिळाला विचित्र नजारा

पोराची बातच न्यारी! थेट चालू सामन्यातच स्कूटर घेऊन घुसला मैदानात, पाहायला मिळाला विचित्र नजारा

May 10, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Cricket-Funny-Moment

Photo Courtesy: Screengrab/twitter/TheBarmyArmy


जगभरात क्रिकेटचे असंख्य चाहते आहेत. या चाहत्यांना क्रिकेट सामने पाहण्याची चांगलीच उत्सुकता असते. त्यामुळे कधी-कधी उत्साहाच्या भरात चाहते असे काही करतात, ज्याने सर्वजण हैराण झाल्याशिवाय राहत नाहीत. अतिशयोक्ती तर तेव्हा होते, जेव्हा हे चाहते थेट सामन्यात घुसतात. असाच एक चाहता इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या काऊंटी क्रिकेटमध्ये घुसला होता. विशेष म्हणजे, तो यादरम्यान थेट स्कूटर घेऊन घुसला होता. त्यामुळे विचित्र नजारा पाहायला मिळाला, जो तुम्ही क्वचितच पाहिला असेल. यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

चालू सामन्यात स्कूटर घेऊन घुसला मुलगा
खरं तर, सामन्यादरम्यान अनेकदा तुम्ही चाहत्यांना मैदानात घुसताना पाहिले असेल. मात्र, स्कूटर घेऊन चालू सामन्यात जाण्याची कल्पनाही करणे जरा कठीणच. मात्र, असे खरोखर घडले आहे. इंग्लंडमध्ये खेळल्या जात असलेल्या काऊंटी क्रिकेटमधील (County Cricket) एका क्लब क्रिकेट सामन्यात अशीच एक घटना पाहायला मिळाली. या सामन्यात एक मुलगा थेट स्कूटर घेऊन घुसला. यामुळे सामनाही थांबवावा लागला होता.

हैराण करणारी बाब अशी की, सुरक्षा रक्षकांनाही चकवत हा मुलगा खेळपट्टीपर्यंत पोहोचला आणि मजेत आपली स्कूटर चालवत राहिला. त्यामुळे खेळाडूंकडेही हा मुलगा मैदानातून बाहेर जाण्याची वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तसेच, या व्हिडिओला २ लाखांहून अधिक व्ह्यूजही मिळाले आहेत.

The youth of today pic.twitter.com/p4BVxDPzMD

— Heather Knight’s Barmy Army (@TheBarmyArmy) May 9, 2022

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

भारतातही घडली होती अशी घटना
जेव्हा हा मुलगा चालू सामन्यात खेळपट्टीपर्यंत पोहोचतो, तेव्हा समालोचकही आपापसात ओरडताना दिसतायेत. मात्र, क्रिकेटच्या मैदानावर घडणारी ही पहिली घटना नाहीये. यापूर्वीही अशाप्रकारच्या घटना समोर आल्या आहेत. अशी घटना भारतातही पाहायला मिळाली आहे. काही काळापूर्वी रणजी ट्रॉफ सामन्यादरम्यान एक व्यक्ती मैदानावर थेट कार घेऊन घुसला होता. दिल्ली आणि उत्तर प्रदेश संघात खेळल्या गेलेल्या या सामन्यात विचित्र घटना पाहायला मिळाली होती. त्यावेळी सामन्यात गौतम गंभीर, इशांत शर्मा यांसारखे आंतरराष्ट्रीय खेळाडूही रणजी सामन्याचा भाग होते.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

हे काय? पोलार्डने लाईव्ह सामन्यात पंचांना मारला बॉल आणि लागला हसू, कर्णधार रोहितनेही दिली साथ

केकेआरचा कर्णधार आणि कोचमध्ये नाही सर्वकाही अलबेल, माजी क्रिकेटरच्या प्रतिक्रियेने खळबळ

मुंबई इंडियन्सच्या पराभवाचे खलनायक ठरले ‘हे’ ३ क्रिकेटर्स, रोहितच्या भरवशाच्या खेळाडूचाही समावेश


ADVERTISEMENT
Next Post
Rovman-Powell

क्रिकेटर नसता, तर 'हे' काम करून देशाची सेवा केली असती; दिल्लीच्या 'दबंग' खेळाडूचा मोठा खुलासा

Virat-Kohli

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून विराटचा पत्ता होणार कट? निवडकर्ते करणार कोहलीशी चर्चा

Shikhar-Dhawan-And-Preity-Zinta

'छोटी बच्ची हो क्या!' म्युझिकवर शिखर धवनने मालकिणीसोबत केला वर्कआऊट, पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.