टीम इंडियाने (Team india) रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली आजच्याच दिवशी टी20 वर्ल्ड कप 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून 13 वर्षांपासून चालू असलेला ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपवला होता. अंतिम सामन्यात जरी विराट कोहली (Virat Kohli), हार्दिक पांड्या (Hardik pandya) आणि जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah) यांनी चांगली कामगिरी केली असली, तरी एक असा खेळाडू होता ज्याने संपूर्ण स्पर्धेत प्रत्येक सामन्यात जबरदस्त खेळ करून भारताच्या विजयात मोठा वाटा उचलला होता. या खेळाडूने स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतकं, सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक चौकार-षटकार झळकावले होते.
वनडे वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. यामुळे कोट्यावधी भारतीय चाहत्यांची मनं तुटली होती आणि हा दु:ख रोहित शर्माच्या (Rohit Sharma) मनातही खोलवर होतं. यानंतर टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये रोहित शर्मा वेगळ्याच जोमात खेळताना दिसला. या स्पर्धेत रोहित शर्माने भारतासाठी सर्वाधिक धावा, सर्वाधिक अर्धशतकं, एका डावात सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक चौकार-षटकार ठोकले होते.
रोहित शर्माने टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये एकूण 257 धावा केल्या. या वेळी त्याचा स्ट्राईक रेट 156.70 होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने सर्वाधिक 92 धावा केल्या होत्या. एवढंच नाही तर रोहितने भारताकडून या स्पर्धेत सर्वाधिक 3 अर्धशतकं ठोकली. या स्पर्धेत त्याने एकूण 24 चौकार आणि 15 षटकार मारले.
त्याआधी भारताने एम.एस. धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली शेवटची ICC ट्रॉफी, वनडे वर्ल्ड कप 2011 जिंकली होती. त्यानंतर विराट कोहलीच्या आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताला कोणतीही ICC ट्रॉफी जिंकता आली नव्हती. अखेरीस रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने (Team india) 13 वर्षांनी ICC ट्रॉफीवर नाव कोरलं. रोहित शर्मा ICC स्पर्धा जिंकणारा भारतासाठी चौथा कर्णधार ठरला. टी20 वर्ल्ड कप 2024 नंतर भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचाही (ICC Champions trophy) किताब जिंकला.
टी20 वर्ल्ड कप 2024 च्या अंतिम सामन्यात मात्र रोहित शर्माला फार धावा करता आल्या नाहीत. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रोहित 5 चेंडूत 9 धावा करून बाद झाला. या डावात त्याने 2 चौकार मारले. अंतिम सामन्यात भारतासाठी विराट कोहलीने (Virat Kohli) सर्वाधिक 76 धावा केल्या, ज्यात 6 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.0