---Advertisement---

भारताकडून 97 धावांनी झालेल्या पराभवानंतर इंग्लंडचं मोठं नुकसान, ‘या’ कारणामुळे ICC ने दंड ठोठावला!

On: रविवार, जून 29, 2025 5:20 PM
---Advertisement---

इंग्लंड संघावर मोठा दंड लावण्यात आला आहे. ही घटना शनिवारी झालेल्या टी20 सामन्याशी संबंधित आहे, ज्यामध्ये भारतीय संघाने इंग्लंडचा 97 धावांनी पराभूत केला (IND vs ENG). या सामन्यात कर्णधार स्मृती मानधनाने (Smriti Mandhana) भारतीय महिला संघासाठी 112 धावांची शानदार खेळी केली. इंग्लंड संघावर हा दंड स्लो-ओव्हर रेट म्हणजे ठरलेल्या वेळेत कमी ओव्हर टाकल्यामुळे ठोठावण्यात आला आहे. नॉटिंघममध्ये खेळलेल्या पहिल्या टी20 सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

आयसीसीने (ICC) स्टेटमेंट जाहीर करून सांगितले आहे की, मॅच रेफरिंजच्या पॅनलने असं आढळलं की इंग्लंड संघाने ठरलेल्या वेळेत दोन षटके कमी टाकली. ICC च्या नियमावलीतील आर्टिकल 2.22 नुसार हा दंड लावण्यात आला आहे. या आर्टिकलमध्ये ओव्हर रेटशी संबंधित नियम दिलेले आहेत. जर एखाद्या गोलंदाज संघाने ठरलेल्या वेळेत सर्व षटके पूर्ण केल्या नाहीत, तर त्या वेळेनंतर टाकलेल्या प्रत्येक षटकामुळे खेळाडूंना मॅच फीच्या 5 टक्के दंड भरावा लागतो. त्यामुळे या पहिल्या टी20 सामन्यात इंग्लंड संघावर एकूण 10 टक्के दंड आकारण्यात आला आहे.

सामन्यातील चारही अंपायर यांनी स्लो-ओव्हर रेटची बाब नमूद केली होती. इंग्लंडची कर्णधार नॅट साइव्हर ब्रंटने (Nat Sciver-Brunt) हे आरोप मान्य केल्यामुळे पुढे काही कार्यवाही करण्याची गरज भासली नाही.

या सामन्यात भारतीय संघाने (Indian women’s cricket team) प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारली होती. भारतीय सलामीवीर शेफाली वर्मा (Shefali Verma) काही खास करू शकली नाही, ती फक्त 20 धावा करून बाद झाली. पण कर्णधार स्मृती मानधनाने (Smriti Mandhana) 112 धावांची तुफानी खेळी केली. या खेळीदरम्यान तिने महिला टी20 क्रिकेटमध्ये भारताकडून दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात वेगाने शतक ठोकलं. तिने केवळ 51 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. तसेच हरलीन देओलनेही (Harleen Deol) 43 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संपूर्ण संघ फक्त 113 धावांत ऑल आऊट झाला. कर्णधार नॅट साइव्हर ब्रंट सोडल्यास इतर कोणीही मोठी खेळी करू शकली नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---