बंगाल क्रिकेट संघासाठी 16 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा खेळलेल्या रोहित यादवने बुधवारी (11 जानेवारी) आत्महत्या केली. रोहित यादव 2019-20 साली बंगालच्या 16 वर्षांखालील संघाचा भाग राहिला होता. बुधवारी त्याने बंगालच्या हावडा जिल्ह्यात राहत्या घरी त्याने स्वतःचे आयुष्य संपवले.
रोहित यादव (Rohit Yadav) बांगलाच्या हावडा (Howrah) जिल्ह्यात त्याच्या कुटुंबासोबत राहत होता. राहत्या (Cricketer Rohit Yadav Sucide) घरी त्याने आत्म’हत्या केल्यामुळे त्याच्या कुटुंबियांसह सर्वांनाच मोठा धक्का बसला. बुधवारी सकाळी कुटुंबियांना रोहित त्याच्या खोलीत अंथरूणात बेशुद्ध अवस्थेत दिसला. त्याला तत्काळ स्थानिक रुग्णालयात नेले गेले, पण रुग्णालयात त्याला मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, क्रिकेटपटूचे असे अचाणक जाणे सर्वांसाठी अश्चर्याचे आहे. पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केला आहे. सुरुवातीच्या तपासावरून असे सांगितले जात आहे की, रोहितने शक्यतो विष प्राशन करून आयुष्य संपवले.
पोस्ट मार्टमनंतर रोहित यादवच्या मृत्यूचे खरे कारण समोर येऊ शकेल. रोहितच्या कुटुंबातील सदस्यांनी अशी शंका व्यक्त केली आहे की, तो आर्थिक अडचणीत असल्यामुळे त्याने आत्म’हत्येचे पाऊल उचलले असावे. दरम्यान, कुटुंबियांसाठीही रोहित असे कुठले पाऊल उचलेल, असे वाटले नव्हते. क्रिकेट कारकीर्द पुढे घेऊन जाण्यासाठी रोहितला घरून आर्थिक सहाय्य मिळत नसल्याने तो मागच्या काही निराश होता. यादरम्यानच्या काळात त्याने परिचित लोकांकडून क्रिकेटचे साहित्य खरेदी करण्यासाठी कर्ज घेतले होते. रोहितच्या घरी कमाईचा कुठलाच मार्ग नसल्यामुळे कुटुंबीय त्याला आर्थिक मदत करू शकत नव्हते. अशा परिस्थितीत रोहितने एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज घेण्यास सुरुवात केली होती, असा दावा देखील कुटुंबातील सदस्यांनी केला.
परिणामी त्याच्यावरील कर्ज वाढत गेले आणि रोहित पूर्णपणे कर्जबाजारी झाला. याच कारणास्तव त्याने आत्म’हत्या केल्याची शक्यता कुटुंबीयांनसह परिचयातील व्यक्तिंकडून वर्तवली जात आहे. माहितीनुसार मागच्या काही दिवसांपासून रोहित अस्वस्थ वाटत होता, पण तो आत्म’हत्या करेल असे कुणाला वाटले नव्हते. त्याचे सहकारी आणि मित्रांना देखील याविषयी कुठली शंका जाणवली नव्हती. रोहितला सर्वत आधी बंगाल क्रिकेट संघाच्या 35 सदस्यीय संघात सामील केले गेले होते. नंतर त्याला बंगालच्या 16 वर्षांखाली संघात संधी दिली गेली आणि त्याने प्लेइंग इलेव्हनमध्येही स्थान मिळवले होते. (The cricketer committed suicide as he could not repay the loan taken to buy the cricket kit)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अनसोल्ड राहिलेला शनाका खेळणार आयपीएल 2023? श्रीलंकेचे प्रशिक्षक म्हणतायेत…
जवळपास अशक्यच! सचिनचा ‘हा’ विक्रम मोडणे विराटच्या आवाक्याबाहेर, करावी लागेल अविश्वसनीय कामगिरी