आयपीएल २०२१ मध्ये १ ऑक्टोंबरला पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाइट रायजर्स यांच्यात हंगामातील ४५ वा सामना खेळला गेला. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडला. सामन्यात दोन्ही संघांमध्ये चांगलाच संघर्ष पाहायला मिळाला. या सामन्यात पंजाब किंग्ज कर्णधार केएल राहुलने चांगल्या फलंदाजीचे प्रदर्शन केले आणि त्याच्या संघास सामन्यात ५ विकेट्सने विजय मिळवून दिला. दरम्यान, सामन्यात एक गोंडस बाळ स्टेडियममध्ये सामन्याचा आनंद घेताना दिसले आणि त्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
हे गोंडस बाळ पंजाब किंग्जच सह मालकिण प्रीति झिंटासोबत स्टेडियममध्ये दिसले होते. प्रीतिला नेहमीच स्टेडियममध्ये सामना पाहताना आणि पंजाब किंग्जला प्रोत्साहन देताना पाहिले गेले आहे. पण या सामन्यात पहिल्यांदाच तिच्यासोबत एक लहान बाळ दिसल्यामुळे अनेकांना प्रश्न पडला आहे की, हे बाळ आहे तरी कोणाचे? पाहता पाहता या बाळाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत आणि लोकांना या प्रश्नाचे उत्तर मिळत नाहीये की, हे बाळ कोणाचे आहे?
फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी असा अंदाज लावला की, हे बाळ पंजाब किंग्जच्या एका क्रिकेटपटूचे आहे. तर काहींनी सांगितले होते की, हे बाळ पंजाबच्या सपोर्ट स्टाफमधील एका सदस्याचे आहे. मात्र, आता या बाळाचे आई आणि वडीलांची माहिती समोर आली आहे. पंजाब किंग्जचा क्रिकेटपटू मनदीप सिंग आणि त्याची पत्नी जगदीप जसवाल यांचे हे बाळ असल्याचे समोर आले आहे.
https://www.instagram.com/reel/CUftlNEMkOR/?utm_source=ig_web_button_share_sheet
मनदीपच्या इंस्टाग्राम खात्यावर एकदा नजर टाकली, तर तुम्हालाही हे लगेच लक्षात येऊ शकते. त्याने त्याची पत्नी आणि बाळासोबतचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत.
https://www.instagram.com/p/CTUlHjsBcnU/?utm_source=ig_web_button_share_sheet
दरम्यन, बाॅलिवुड अभिनेत्री प्रीति झिंटा तिची आयपीएल फ्रेंचायझी पंजाब किंग्जला सपोर्ट करण्यासाठी नेहमीच स्टेडियममध्ये उपस्थित असते आणि तिचे स्टेडियममधील अनेक फोटोही आजपर्यंत व्हायरल झाले आहेत. पण केकेआरसोबत झालेल्या सामन्यात मात्र, या गोंडस बाळाने प्रीतिपेक्षा जास्त लोकप्रियता मिळवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अबु धाबीत ऋतुराज नावाचे वादळं अन् इकडे ‘या’ भारतीय क्रिकेटरला भरली धसकी, भविष्यात करेल पत्ता कट!
चार संघ शर्यतीत असूनही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये मारणार धडक, प्रशिक्षकाने सांगितला ‘फॉर्म्यूला’
प्लेऑफचे सामने सुरू होण्यापूर्वी सीएसकेला मोठा धक्का, ४ अर्धशतक ठोकणारा ‘हा’ फलंदाज जखमी