अजिंक्य रहाणे याने चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळलेल्या पहिल्याच सामन्यात आपली प्रतिभा पुन्हा दाखवून दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळत नसलेल्या रहाणेला शनिवारी (8 एप्रिल) मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली. हंगामातील आपल्याच पहिल्याच सामन्यात रहाणेने ताबडतोड अर्धशतक ठोकले. सामना सुरू होण्याच्या काही वेळ आधी त्याला खेळायचे आहे, असे सांगितले गेले होते.
अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज असला, तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर सध्या त्याला संधी मिळत नाहीये. रहाणेची आयपीएल कारकिर्द देखील जबरदस्त राहिली आहे. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघांचे प्रतनिधित्व केले आहे. यावर्षी रहाणे पहिल्यांदाच चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळत आहे. आयपीएल 2023च्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये रहाणेलाल सीएसकेच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. पण तिसऱ्या सामन्यात त्याने संघासाठी वरच्या फळील धमाकेदार खेळी केली. शनिवारी मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर रहाणेने 27 चेंडूत 61 धावा कुटल्या. अवघ्या 19 चेंडूत त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. चालू आयपीएल हंगामातील हे सर्वात वेगवान अर्धशतक देखील ठरले.
रहाणे आणि संघातील इतर खेळाडूंच्या प्रदर्शनाच्या जोरावर सीएसकेने मुंबई इंडियन्सविरुद्धचा हा सामना 7 विकेट्से जिंकला. विजयानंतर रहाणे सामना संपल्यानंतर म्हणाला, “खेळताना खूपच मजा आली. नाणेफेक होण्याआधी मला माहीत पडले की, मोईन अली ठीक नाहीये. (स्टीफन) फ्लेमिंग मला म्हणाले की, तू खेळणार आहेत. देशांतर्गत क्रिकेटचा हंगाम माझ्यासाठी चांगला गेला होता. असात या सामन्यात जास्त वेगळे काहीतरी करण्याचा मी प्रयत्नच केला नाही. माझे लक्ष्य टायमिंगवर होते.”
From a glittering first game in #CSK colours 💛 to the secret ingredient behind Jadeja's stunning catches 😎
Match-winners @imjadeja & @ajinkyarahane88 sum up a delightful Wankhede win 👌👌 – By @Moulinparikh
Full Interview 🎥🔽 #TATAIPL | #MIvCSK https://t.co/GPltQkGaza pic.twitter.com/9nl9cmvPGz
— IndianPremierLeague (@IPL) April 9, 2023
रहाणे पुढे म्हणाला, “आयपीएल एक मोठी स्पर्धा आहे. तुम्हाला कधी संधी मिळेल, हे सांगता येत नाही. वानखडे स्टेडियमवर खेळण्याचा मी नेहमीच आनंद घेत आलो आहे. मी याठिकाणी एकही कसोटी सामना खेळला नाहीये, जो खेळू इच्छितो. एमएस दोनी आणि प्लेमिंग खेळताना सूट देतात. चांगली तयारी कर, असे धोनीने आधीच सांगितले होते.”
दरम्यान, मुंबईविरुद्धच्या या सामन्यात बेन स्टोक्स आणि मोईन अली हे दोन महत्वाचे अष्टपैलू खेळले नाहीत. अशात संघ व्यवस्थापनाकडून रहाणेला संधी दिली गेली. सामन्याचा एकंदरीच विचार केला, तर प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 8 बाद 157 धावा केल्या. प्रत्युत्तरात सीएसकेने 18.1 आणि 3 विकेट्सच्या नुकसानावर विजय मिळवला. या सामन्यातील वादळी खेळीनंतर सीएसकेच्या आगामी सामन्यात रहाणेला संधी मिळणार की नाही, हे पाहण्यासारखे असेल. (The decision to play Ajinkya Rahane in the match against Mumbai Indians was taken suddenly.)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जडेजाने फक्त कॅच नाही घेतला, अंपायरचा जीव पण वाचवलाय; एक्सप्रेसच्या वेगाने आलेला चेंडू जड्डूने चित्त्याच्या चपळाईने पकडला
“अनुभवी खेळाडूंनी जबाबदारी घ्यावी”, सलग दुसऱ्या पराभवानंतर रोहितचा संघसहकाऱ्यांना इशारा