श्रीलंका संघ सध्या भारताबरोबर एकदिवसीय मालिका खेळण्यात व्यस्त आहे. तत्पूर्वी इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यामध्ये होणाऱ्या आगामी कसोटी मालिकेसाठी इंग्लंडनं संघ जाहीर केला आहे. सलामीवीर जॅक क्रॉली दुखापतीमुळे कसोटी मालिकेत सहभागी होणार नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात क्रॉलीच्या उजव्या हाताच्या करंगळीला दुखापत झाली असून त्याचं बोट फ्रॅक्चर झालं आहे.
जॉर्डन कॉक्स आणि ऑली स्टोन यांचा इंग्लंड संघात समावेश करण्यात आला आहे. एसेक्सचा मधल्या फळीतील फलंदाज कॉक्स हा गेल्या वर्षीच्या पाकिस्तान दौऱ्यात एसेक्ससाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता, त्यानं 69.36च्या सरासरीनं 763 धावा केल्या त्याच्या नावावर 3 शतकं आहेत. तर ऑली स्टोन 2021 नंतर प्रथमच इंग्लंड संघात पुनरागमन करत आहे. नॉटिंगहॅमशायरच्या या वेगवान गोलंदाजानं 3 कसोटी खेळल्या आहेत, ज्यामध्ये त्यानं 19.4च्या सरासरीनं 10 विकेट्स घेतल्या आहेत.
दोन्ही संघांमधील पहिली कसोटी 21 ऑगस्टपासून मँचेस्टरमध्ये सुरु होणार आहे. ही मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 चा भाग असेल. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत व्हाईटवॉश झाल्यानंतर श्रीलंका 50 गुणांच्या टक्केवारीसह चौथ्या स्थानावर आहे, तर इंग्लंड सहाव्या स्थानावर आहे. दुसरा कसोटी सामना 29-2 ऑगस्ट दरम्यान खेळला जाणार आहे. तर तिसरा कसोटी सामना 6-10 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे.
श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघ-
बेन स्टोक्स (कर्णधार), गस ऍटकिन्सन, शोएब बशीर, हॅरी ब्रूक, जॉर्डन कॉक्स, बेन डकेट, डॅन लॉरेन्स, ऑली पोप, मॅथ्यू पॉट्स, जो रुट, जेमी स्मिथ, ऑली स्टोन, ख्रिस वोक्स, मार्क वुड.
महत्त्वाच्या बातम्या-
उपांत्यपूर्व सामन्यात दुखापतग्रस्त..! कुस्तीमध्ये भारताच्या निशा दहियाचा पराभव
IND vs SL शेवटच्या एकदिवसीय सामन्यात ‘या’ खेळाडूचं होणार संघात पुनरागमन?
अय्यर, राहुल यांच्याआधी शिवम दुबे फलंदाजीला का आला? सहाय्यक प्रशिक्षक नायरने सांगितले कारण