भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात होता. सामन्याच्या दुसऱ्या दिवसाखेर भारतीय संघ आघाडीवर होता. पण खेळ रंगात आला असतानाच इंग्लिश चाहत्यांकडून बीसीसीआयच्या व्यवस्थापनावर प्रश्न उफस्थित केला गेला आहे. हैदराबाद स्टेडियमवर विदेशी चाहत्यांची गैरसोय होत असल्याचे समोर येत आहे.
इंग्लंड क्रिकेट संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी सध्या भारत दौऱ्यावर आहे. उभय संघांतील पहिल्या कसोटी सामन्यासाठी मैदानात प्रेक्षकांनी मोठ्या संख्येत उपस्थिती लावली. यातील हजारो चाहते इंग्लंड संघाला चीअर करण्यासाठी आले आहेत. पण या विदेशी चाहत्यांना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमकडून (Rajiv Gandhi International Cricket Stadium) चांगल्या दर्जाची व्यवस्था दिली गेली नाहीये. चाहत्यांना सिक्यॉरिटीपासून ते स्टेडियममधील स्वच्छतेपर्यंत अनेक गोष्टींबाबत समस्या आहेत. एका चाहत्याने सोशल मीडियावर स्टेडियमच्या वॉशरुमचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओत हे वॉशरूमधील अस्वच्छता स्पष्टपणे दिसू शकते.
त्याचसोबत इंग्लिश मीडियामध्येही बीसीसीआय आणि भारतीय संघावर निशाणा साधला गेला आहे. एका इंग्लिश वृत्तपत्राने लिहिले आहे की, “भारतात येणाऱ्या चाहत्यांना मालिका सुरू होण्याआधीच कडक सुरक्षेबाबत माहिती दिली गेली होती. पण व्यवस्थापन साध्या गोष्टी समजून घेत नसल्याने अनेकांना विश्वास बसत नाहीये. खासकरून स्टेडियममध्ये पाण्याची कमतरता आहे. तसेच 29 डिग्री तापमानात सनस्क्रीनसारख्या वस्तून जप्त केल्या गेल्या जात आहेत.”
@BCCI @bhogleharsha
India Vs England Test Match Day -2 Hyderabad – Pathetic basic facilities – No water to drink, no food available, toilets not cleaned for ages…spiders everywhere…
Kindly look into it… pic.twitter.com/FPQXUTaM4V— Sanjay Katare (@SanjayKatare1) January 27, 2024
वृत्तांमुध्ये असा दावा केला गेला आहे की, पाण्याची कमी असल्यामुळे प्रेक्षकांचा अधिक वेळ पाणी घेताना लाईनमध्ये जात आहे. अशात कसोटी सामन्याचा आनंद लुटता येत नाही, असेही सांगितले गेले आहे. सामना पाहण्यासाठी आलेल्या वरिष्ठ नागरिकांना या अडचणींचा जास्त त्रास होत आहे. (The English fans are getting upset because of the inconvenience in the Hyderabad Test)
महत्वाच्या बातम्या –
शॉकिंग! दिग्गज भारतीय क्रिकेटरचा मृत्यू, गोलंदाजी करतानाच घेतला शेवटचा श्वास
मुलगा स्टार भारतीय क्रिकेटर, पण बाप तरीही वाहतोय सिलिंडर, पाहा व्हायरल व्हिडीओ