आयपीएल 2023 हंगाम सुरू होऊन काहीच दिवस झाले आहेत. पण खेळाडूंच्या दुखापतीच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. पंजाब किंग्ज संघाचा राज अंगद बावा देखील दुखापतग्रस्त आहे. अशात हंगामातील आपला दुसरा सामना खेळण्यापूर्वी पंजाबच्या संघात महत्वाचा बदल पाहायला मिळाला. राज बावाच्या जागी पंजाब किंग्ज संघात गुरनूर सिंग बरार याला घेतले गेले आहे.
गुरनूर सिंग बरार (Gurnoor Singh Brar) देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाब संघासासाठी खेळतो. आता त्याला पंजाब किंग्ज संघाकडून आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. पंजाब किंग्जने गुरनूरला संघात घेण्यासाठी 20 लाख रुपये खर्च केले आहेत. तो एक अष्टपैलू खेळाडू असून राज अंगद बावा (Raj Angad Bawa) याची संघातील जागा घेऊ शकतो.
आयपीएल 2022 मध्ये खेळला होता राज बावा
राज बावा आयपीएल 2022 मध्ये पंजाब किंग्जचा भाग असून त्याला दोन सामन्यांमध्ये खेळण्याची संधीही मिळाली. या दोन सामन्यांमध्ये एका चौकारासह राज बावाने 11 धावा केल्या होत्या. यावर्षीही संघ व्यवस्थापनाकडून त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकत होती. पण आपल्या डाव्या खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे राज बावाने संपूर्ण आयपीएल हंगामातून माघार घेतली. आगामी हंगामा त्याच्या जागी पंजाब संघात सामील झालेला गुरनूर बरार डावखुला फलंदाज आणि डावखुरा वेगवान गोलंदाज आहे.
अशी राहिली गुरनूर सिंग बरार
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पंजाब संघाचे प्रतिनिधित्व करत असलेला गुरनूर बराड आतापर्यंत 5 रणजी आणि एक लिस्ट ए सामना खेळला आहे. रणजी सामन्यांमध्ये बराडने 26.75 च्या सरासरीने 107 धावा केल्या आहेत. यादरम्यान गुरनूर सिंग बराडने एक अर्धशतक देखील केले. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 64 होती. गोलंदाजीच्या बाबतीत गुरनूरने प्रथम श्रेणीत 45.57 च्या सरासरीने 7 विकेट्स घेतल्या. तसेच लिस्ट ए क्रिकेटमध्ये गुरनूर सिंगने 1 विकेट घेतली आहे. दरम्यान, चालू आयपीएल हंगामातील पहिला सामना पंजाब किंग्जने जिंकला आहे. हंगामातील दुसरा सामना पंजाब किंग्जला बुधवारी (5 एप्रिल) सायंकाळी राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळायचा आहे. (The entry of a powerful player in Punjab Kings to replace the injured Raj Bawa, the price paid by the franchise)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पंच नितीन मेननचं स्वप्न खरं होणार! पहिल्यांदाच करणार ‘या’ महत्वाच्या मालिकेत अंपायरिंग
टार्टेग चेस करताना गुजरातला रोखणे कठीणच! आकडेवारी पाहून बसेल धक्का