कॅनबेरा। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात तिसरा वनडे सामना बुधवारी(२ डिसेंबर) कॅनबेरा येथे झाला. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने खास विक्रम केला आहे. विराटने या सामन्यात खेळताना १२ हजार धावा पूर्ण केल्या आहेत.
त्याने या सामन्यात २३ वी धाव घेताच वनडेमध्ये १२ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. वनडेमध्ये हा टप्पा पार करणारा तो भारताचा दुसराच क्रिकेटपटू ठरला आहे, तर एकूण सहावा क्रिकेटपटू ठरला आहे. याबरोबरच तो वनडेमध्ये सर्वात जलद १२ हजार धावा करणाराही क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने २५१ व्या वनडे सामन्यातील २४२ व्या डावात खेळताना हा कारनामा केला आहे.
याआधी हा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. त्याने ३०९ वनडे सामन्यांच्या ३०० डावांमध्ये १२,००० धावा पूर्ण केल्या होत्या. सचिनने वनडेमध्ये १८००० धावांचा टप्पाही पार केला आहे. हा टप्पा पार करणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे. विशेष म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त आत्तापर्यंत कोणत्याही क्रिकेटपटूने वनडेमध्ये १५००० धावांचा टप्पा पार केलेला नाही. त्यामुळे वनडेमध्ये सध्या १३०००, १४०००,१५०००. १६०००, १७००० आणि १८००० धावांचा टप्पा सर्वात जलद पार करण्याचा विश्वविक्रमही सचिनच्याच नावावर आहे.
मात्र जर विराट याच वेगाने धावा करत राहिला तर तो सचिनचे हे विक्रम सहज मोडू शकतो. कारण विराट हा वनडेमध्ये ८०००, ९०००, १०००० आणि ११००० धावांचा टप्पा सर्वात जलद पार करणाराही क्रिकेटपटू आहे.
विराटच्या आता ५९.३१ च्या सरासरीने १२०४० धावा झाल्या आहेत. यात त्याच्या ४३ शतकांचा आणि ६० अर्धशतकांचा समावेश आहे. बुधवारी विराटने ७८ चेंडूत ५ चौकारांसह ६३ धावा केल्या.
वनडेमध्ये १००० ते १८००० धावांचे टप्पे सर्वात जलद पार करणारे क्रिकेटपटू –
१००० – फखर जमान
२००० – हाशिम आमला
३००० – हाशिम आमला
४००० – हाशिम आमला
५००० – हाशिम आमला
६००० – हाशिम आमला
७००० – हाशिम आमला
८००० – विराट कोहली
९००० – विराट कोहली
१०००० – विराट कोहली
११००० – विराट कोहली
१२००० – विराट कोहली
१३००० – सचिन तेंडुलकर
१४००० – सचिन तेंडुलकर
१५००० – सचिन तेंडुलकर
१६००० – सचिन तेंडुलकर
१७००० – सचिन तेंडुलकर
१८००० – सचिन तेंडुलकर
महत्त्वाच्या बातम्या –
मागील ४ वर्षात या भारतीय क्रिकेटपटूंनी ऑस्ट्रेलियामध्ये केले वनडे पदार्पण
पदार्पण करताच टी नटराजनचे नाव झहिर खान, नेहरा, इरफान पठाणच्या पंक्तीत
पदार्पण करताच टी नटराजनचे नाव झहिर खान, नेहरा, इरफान पठाणच्या पंक्तीत