आयपीएल २०२० चा अंतिम सामना मंगळवारी (10 नोव्हेंबर) मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात खेळला जात आहे. हा सामना मुंबईचा कर्णधार रोहित शर्मासाठी खूप खास आहे. रोहित आपल्या आयपीएल कारकिर्दीतला 200 वा सामना खेळत आहे.
आयपीएल च्या 13 व्या हंगामात मुंबईच्या संघाने जबरदस्त कामगिरी करत अंतिम सामन्यात धडक दिली आहे. या सामन्यात मुंबईचा संघ पाचव्या किताबासाठी दिल्लीविरुद्ध मैदानात उतरणार आहे, तर दिल्लीचा संघ देखील 13 वर्षांची प्रतीक्षा संपवून दिल्लीला जेतेपद मिळवून देण्यासाठी संघर्ष करणार आहे. या सामन्यात मुंबईचे नेतृत्व करणारा रोहित शर्मा त्याचा 200 वा सामना आयपीएल सामना खेळणार आहे. ज्याला खरोखरच खूप मोठे स्वरूप प्राप्त झाले आहे. हा सामना विस्मरणीय बनविण्याचा तो प्रयत्न करणार आहे.
रोहित शर्माची आयपीएल मधील सुरुवात
टी-20 विश्वचषक 2007 मध्ये रोहित शर्माने दक्षिण अफ्रिके विरोधात अर्धशतकी खेळी करत भारताला उपांत्य सामन्यात पोहोचवले होते. हा रोहितचा पहिला सामना होता व हे नाव लोकांच्या प्रथम परिचयास आले होते. 2008 पासून सुरू झालेल्या पहिल्या आयपीएल स्पर्धेत रोहित शर्मा डेक्कन चार्जर्स संघाकडून खेळत होता. या संघाकडून रोहित शर्मा 2008-2010 असे तीन वर्षे खेळला होता. त्याने 45 सामन्यांत 1170 धावा या संघासाठी केल्या आहेत. ज्यात 8 अर्धशतकी खेळ्या देखील समाविष्ट होत्या. डेक्कन चार्जर्सकडून खेळताना रोहितने 14 बळी देखील घेतले आहेत. शिवाय 2009 च्या विजयानंतर त्याला पहिल्यांदाच आयपीएल ट्रोफी उंचावण्याची संधी याच संघातून मिळाली होती.
मुंबई इंडियन्स संघासाठी 10 वर्षे
आयपीएलच्या चौथ्या हंगामापासून म्हणजेच 2011 पासून रोहित शर्मा मुंबई संघाचा भाग झाला आहे. त्याने आतापर्यंत मुंबई संघासाठी 154 सामन्यांत 3992 धावा केल्या आहेत. यात 1 शतक आणि 30 अर्धशतकांचा समावेश आहे. 2013 साली त्याला मुंबईचे कर्णधारपद मिळाले. त्यानंतर 2015 पासून त्याने मुंबईसाठी कधीही गोलंदाजी केलेली नाही. त्याने मुंबईसाठी एकमात्र बळी 2014 साली गोलंदाजी करताना घेतला होता.
रोहित शर्मा 200*
रोहित शर्माने 13 वर्षांच्या आयपीएल कारकिर्दीत 200 सामन्यांत 5132 धावा केल्या असून यात 1 शतक व 38 अर्धशतके आहेत. रोहितने कर्णधार म्हणून मुंबईला 4 वेळा आयपीएलचा किताब जिंकवून दिला असून त्याने आतापर्यंत डेक्कन चार्जर्स समवेत 5 अंतिम सामने खेळले आहेत. आणि या पाचही सामन्यांत त्याला एकदाही पराभव पहावा लागला नाही. निश्चितच त्याच्या कारकिर्दीचा 200 वा सामना म्हणजेच 13व्या हंगामातील आयपीएलचा अंतिम सामना जिंकून तो विजयी घोडदौड कायम ठेवण्याचा विचार करेन.
महत्त्वाच्या बातम्या-
AUS vs IND : आता मैदानात घुमणार प्रेक्षकांचा गजबजाट; ऑस्ट्रेलिया क्रिकेटने केली मोठी घोषणा
IPL FINAL : धवन, पंत, हेटमायर सारख्या डावखुऱ्या फलंदाजांसाठी मुंबई ‘हा’ गोलंदाज उतरवणार मैदानात
IPL – फायनलपूर्वी सचिन तेंडुलकरचा मुंबईला खास संदेश, प्रत्येक खेळाडूला ‘ही’ गोष्ट समजायला हवी
ट्रेंडिंग लेख-
चौथी शिकलेल्या पोराच्या फिरकीपुढे भल्याभल्यांनी घेतलीये गिरकी; वाचा मुंबईच्या प्रमुख फिरकीपटूबद्दल
विराट… ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यातून सोडलास तरीही आम्हाला तुझा अभिमान वाटतोय