---Advertisement---

वर्ल्डकप फायनलसाठी अहमदाबादची वर्णी! जाणून घ्या मुंबईसह इतर शहरांविषयी

On: बुधवार, मार्च 29, 2023 11:31 PM
ahmedabad stadium
---Advertisement---

सध्या सर्वत्र आयपीएल 2023 चे वारे वाहत आहेत. 31 मार्च रोजी आयपीएलचा हा 16 वा हंगाम सुरू होईल आणि 28 मे रोजी अंतिम सामना खेळला जाईल. आयपीएल संपल्यानंतर भारतात आयसीसी वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे. तत्पूर्वी या विश्वचषक स्पर्धेविषयी मोठी माहिती समोर येत आहे.

यावर्षीची वनडे विश्वचषक भारतात होत असल्यानंतर विजेतेपदासाठी भारतीय संघाला इतरांच्या तुलनेत प्रबळ दावेदार मानले जात आहे. विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात खेळली जाणार आहे, हे ठरले आहे. पण भारतात नेमक्या कोणत्या स्टेडियमवर किती सामने होणार याविषयी अद्याप ठोस माहिती समोर आली नव्हती. पण ताज्या माहितीनुसार आघामी वनडे विश्वचषक भारतातील 12 वेगवेगळ्या शहरांमध्ये खेळवला जाणार आहे. 12 बारा शहरांमध्ये प्रत्येकी 4 सामन्यांच्या हिशोबाने 48 सामने खेळवले जातील.

क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार वनडे विश्वचषक 2023 (ICC ODI World Cup 2023) मध्ये प्रत्येकी 4 सामन्यांच्या हिशोबाने 12 वेगवेगळ्या शहरांमध्ये सामने आयोजित केले जातील. माहितीनुसार विश्वचषकाच्या उपांत्य सामन्याचे आयोजन मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर होईल, तर अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. असे असले तरी, याविषयी बीसीसीआय किंवा आयसीसीकडून अद्याप कुढलीच ठोस माहिती मिळाली नाहीये.

भारतीय संघाने 1983 साली कपील देव यांच्या नेतृत्वात पहिल्यांदा विश्वचषक जिंकला. त्यानंतर एमएस धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने 2011 साली दुसरा वनडे विश्वचषक जिंकला. दुसऱ्या विश्वचषकासाठी भारताला तब्बल 28 वर्ष वाट पाहावी लागली होती. त्यानंतर मागच्या 12 वर्षांमध्ये दोन वनडे विश्वचषक खेळले गेले, पण दोन्ही वेळी संघ विजेतेपद पटकावू शकला नाही. पण यावर्षीच्या विश्वचषकात भारत आपला तिसरा विश्वचषक जिंकू शकतो. मायदेशातील परिस्थितीत भारताला आगामी विश्वचषकात इतर संघांच्या तुलनेत अधिक फायदा मिळेल आणि याच कारणास्तव संघ विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे. (The final match of ODI World Cup will be played in Ahmedabad)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! 16व्या आयपीएलसाठी समालोचकांची यादी जाहीर, वाचा सर्व स्टार समालोचकांची नावे
आयसीसी वनडे रँकिंगमध्ये रोहितला पछाडत विराटची गरुडझेप, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फिफ्टीनंतर मोठा फायदा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---