इंग्लंडमधील ओव्हल क्रिकेट मैदान भारतासाठी काहीस खास आहे. भारतीय संघाने या मैदानावर अशी अनेक संस्मरणीय कामगिरी केली आहे. त्यामुळे भारतीयांसाठी ही गोष्ट कायमच अभिमानास्पद राहील. सर्वात खास क्षण म्हणजे जेव्हा क्रिकेटचे चाहते रेडिओवर कान लावून प्रत्येक चेंडूचा, प्रत्येक शॉटचा आनंद लुटत होते.
भारताला 1971 मध्ये स्वतंत्र्य होऊन 24 वर्षे पूर्ण झाली होती. त्यावेळी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर होता. त्यावेळी 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील निर्णायक सामना ओव्हल मैदानावर खेळला गेला. हा सामना अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आपल्या नावावर केला. भारताने इंग्लंडला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे ओव्हलचे मैदान हे भारतीय क्रिकेटपटू आणि चाहत्यांसाठी खास ठिकाण बनले. या मैदानाशी संबंधित भारताची खास कामगिरी जाणून घेऊयात.
1971 च्या कसोटी मालिकेतील विजयाची कहाणी
पतौडींच्या जागी वाडेकर झाले कर्णधार,
वेस्ट इंडिजचा पराभव करून इंग्लंडमध्ये (England) आलेल्या नवाब पतौडींच्या जागी भारतीय संघाचे कर्णधारपद अजित वाडेकर यांच्याकडे सोपवण्यात आले. तर, वाडेकर यांच्या संघाने फेब्रुवारी ते मार्च दरम्यान 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडिज संघाचा 1-0 ने पराभव केला. त्यानंतर जुलै-ऑगस्टमध्ये संघ इंग्लंडमध्ये आला. ही मालिका 3 कसोटी सामन्यांची होती. इंग्लंडमधील लॉर्ड्स आणि मँचेस्टर येथे खेळलेले सामने अनिर्णित राहिले. मात्र, निर्णायक सामना 19 ते 24 ऑगस्ट दरम्यान ओव्हल येथे खेळवण्यात आला.
इंग्लंडने पहिल्या डावात 355 धावा केल्या
इंग्लंडचा कर्णधार रे इलिंगवर्थने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यावेळी भारतीय संघापुढे 355 धावांचा डोंगर उभा केला. यष्टिरक्षक फलंदाज अॅलन नॉटने 95 धावांची चमकदार खेळी खेळली. या खेळीमध्ये त्याने 11 चौकार आणि 1 षटकार मारला. भारताकडून एकनाथ सोलकरने 3 बळी घेतले. भारतानेही झुंज देत 284 धावांचा आकडा गाठला. फारुख इंजिनियरने आपले अर्धशतक पुर्ण करत 59 धावांची खेळी केली. तर, इंग्लिश कर्णधार इलिंगवर्थने सामन्यावेळी 5 बळी घेतले.
चंद्रशेखरचा आश्चर्यकारक खेळ आणि इंग्लंड 101 धावांवर ऑल आऊट झाले
इंग्लंड दुसऱ्या डावामध्ये केवळ 101 धावांवर ऑल आऊट झाला. भागवत चंद्रशेखरने चमकदार कामगिरी करत 38 धावांत 6 बळी घेतले. भागवतचा लेग ब्रेक आणि टॉप स्पिन इंग्लिश फलंदाजांना समजू शकला नाही. अजित वाडेकर यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले की, “चंद्रशेखरचे ते 6 स्पिन संस्मरणीय आहे. सामना संपल्यानंतर एका भारतीय रेस्टॉरंटने आपल्या रेस्टॉरंटमधील सूपचे नाव चंद्रशेखर सूप ठेवले.”
173 धावांचे लक्ष्य, इंजिनिअरची जबरदस्त खेळी
भारतीय संघाला 173 चे ध्येय गाठायचे होते. अजित वाडेकर 45, दिलीप सरदेसाई 40, आणि गुंडप्पा विश्वनाथने 33 धावा केल्या. एकावेळेनंतर भारताच्या 5 विकेट पडल्या होत्या. त्यानंतर फारुख इंजिनियर खेळपट्टीवपर आला आणि त्याने 28 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. विश्वनाथसोबतची भागीदारी संघाला विजयापर्यंत घेऊन गेली. मात्र, विजय मिळेपर्यंत विश्वनाथ खेळपट्टीवर नव्हता. 3 धावा शिल्लक असताना तो बाद झाला. त्यानंतर सय्यद आबिद अली खेळपट्टीवर आला. त्याने चौकार मारून संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
सामन्यावेळी अजित वाडेकर यांच्या कपाळावर सुरकुत्या उमटल्या होत्या आणि त्याचे कारण म्हणजे एकनाथ सोलकरचा सुपर कॅच. कारण होते पहिल्या डावात 91 धावा करणारा अॅलन नॉट. वाडेकरांना माहित होते की तो कधीही सामना पलटवू शकतो. नॉटने फक्त एक धाव घेतली होती. वेंकटराघवनकडे चेंडू सोपवण्यात आला आणि एकनाथ सोलकर शॉर्ट लेगवर उभा होता. नॉट शॉर्ट खेळयला गेला आणि चेंडू शॉर्ट लेगच्या दिशेने जातो. त्यावेळी सोलकरने संस्मरणीय झेल घेतला जो आजही एतिहासिक आहे. सोलकरने एका लेखात लिहिले की- “चेंडुच्या दिशेने मी फक्त उडी मारली. चेंडू बोटात अडकला आणि तो खाली पडणार, पण कसा तरी मी झेल घेतला आणि तो एक संस्मरणीय झेल ठरला.”
चाहत्यांनी हत्तींना जमिनीवर आणले होते..
दुसरी घटना अशी घडली की, सामन्याच्या अंतिम दिवशी गणेश चतुर्थी होती. भारतीय चाहत्यांनी भारताच्या विजयासाठी हत्तीला मैदानावर आणले होते. चाहत्यांनी हे शुभ मानले आणि चेसिंग्टन प्राणीसंग्रहालयातून एक हत्ती भाड्याने आणला. तो हत्ती सामन्यादरम्यान मैदानावर देखील आला. तसेच, त्या हत्तीचे नाव बेला होते. आपल्या खेळीमुळे भारताने सामना जिंकला.
भारत-ऑस्ट्रेलिया सामना पुन्हा रंगणार
जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना 7 जून रोजी दुपारी 3:00 वाजता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवला जाईल. हा सामना इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर होणार असून, ज्याची नाणेफेक दुपारी अडीच वाजता होईल. इंग्लंडमध्ये दोन्ही संघ प्रथमच एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्र इंटरनॅशनल चेस फेस्टीव्हलमध्ये चॅलेंज लढतीत विदित गुजराथी, रौनक साधवानी यांना विजेतेपद
WTC FINAL: यंदाही पाऊस ठरणार विलन? असे असणार लंडनमधील वातावरण, टीम इंडियासाठी…