भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंगच्या घरी मागील काही दिवसांपूर्वी एका नवीन पाहुण्याचे आगमन झाले होते. क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि पत्नी गीता बसरा यांना पुत्र प्राप्ती झाली आहे. आता या जोडप्याने आपल्या मुलाची पहिली झलक चाहत्यांना दाखवली आहे. हरभजन सिंगची पत्नी गीताने नवजात मुलाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा फोटो पाहून चाहत्यांनी त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा द्यायला सुरुवात केली आहे.
पत्नी गीताने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये हरभजनची मोठी मुलगी आपल्या भावाला हातामध्ये घेतलेली दिसून येत आहे. याच बरोबर गीताने एक जबरदस्त कॅप्शन देखील लिहिले आहे. ते कॅप्शन असे आहे की, ‘तुमच्यासाठी सादर करीत आहोत हीर चा वीर … जोवन वीरसिंह प्लाहा.’ अर्थात गीताने तिच्या मुलाचे नावही सर्वांना सांगितले आहे. तिने पोस्ट केलेल्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.
https://www.instagram.com/p/CRx8mwxsfpf/?utm_source=ig_web_button_share_sheet
या महिन्याच्या सुरुवातीलाच हरभजन सिंगने पुत्र प्राप्तीची महिती इंस्टाग्रामच्या माध्यमातून दिली होती. तेव्हा हरभजन ने लिहिले होते की, ‘एका तंदुरुस्त मुलाच्या रुपात आम्हाला दिलेल्या आशिर्वादासाठी देवा तुझे खूप खूप आभार मानतो. गीता आणि मुलगा दोघेही सुखरूप आहेत. आम्ही आनंदाने भारावून गेलो आहोत आणि आमच्या सर्व हितचिंतकांनी दिलेल्या प्रेमासाठी आणि समर्थनासाठी मी खूप आभार मानतो.’
https://www.instagram.com/p/CRI0wWNB6OW/?utm_source=ig_web_button_share_sheet
या अगोदर एका मुलाखतीदरम्यान गीता बसरा म्हणाली होती की, ‘हरभजन सिंगला मुलाच्या रूपात एक खूप चांगला मित्र मिळाला आहे. जर मुलगी झाली असली तर मला आणखी एक चांगली मैत्रीण मिळाली असती. मुलगा झाला त्यामुळे हरभजन सिंगला एक जिवलग मित्र मिळाला. परंतु हो, मी तुम्हाला सांगायचे आहे की, जेव्हा मला रुग्णालयात नेले जात होते; तेव्हा मला अंदाज आला होता की मला मुलगा होईल. हिनायाला जन्म देणे थोडे अवघड होते. यावेळी तो एक चांगला अनुभव होता. माझी काळजी घेणाऱ्या डॉक्टरांच्या आणि त्यांच्या स्टाफची मी खूप आभारी आहे.’
महत्त्वाच्या बातम्या-
गोलंदाजी करताना पोलार्डने केलं असं काही; ऑसी फलंदाज म्हणाला असेल, ‘हुश्श, थोडक्यात वाचलो’!
‘नेहमी मोठ्या भावाच्या चरणात’, म्हणत रणवीर सिंगने केला माहीसोबतचा फोटो शेअर; जिंकली लाखो मने