आजपासून पहिल्या ज्युनियर कबड्डी वर्ल्डकपला(Junior Kabaddi World Cup) सुरुवात झाली आहे. २० वर्षाखालील (मुले) यांची ही स्पर्धा होत आहे. किश इस्लान्ड, इराण(Iran) येथे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे. ११ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा पार पडेल.
आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशन (IKF) यांच्या मान्यतेने ही स्पर्धा घेण्यात येत असून १३ देश सहभागी होत आहेत. पण कबड्डी रसिकांसाठी धक्कादायक गोष्ट म्हणजे भारतीय संघ या स्पर्धेसाठी पाठवण्यात आलेला नाही.
ज्युनियर वर्ल्डकपमध्ये १३ देश सहभागी होत असून त्यांची ४ गटात विभागणी केली आहे. ग्रुप अ मध्ये यजमान इराण तसेच मलेशिया, थायलंड व तुर्कमेनिस्तान आहेत. ब गटात पाकिस्तान, डेन्मार्क व अझरबैजान आहेत. तुर्कमेनिस्तान विरुद्ध मलेशिया यांच्यात उद्घाटन सामन्याने स्पर्धेची सुरुवात झाली आहे.
ज्यूनियर वर्ल्डकपसाठी संघांची गटवारी
अ गट- इराण, मलेशिया, थायलंड, तुर्कमेनिस्तान
ब गट- पाकिस्तान डेन्मार्क, अझरबैजान
क गट- चिनी तैपेई, बांगलादेश, अफगाणिस्तान
ड गट- श्रीलंका, इराक, केनिया