मुंबई। रविवारी झालेल्या दिल्ली डेयरडेविल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात मुंबईला 11 धावांनी पराभूत व्हावे लागले. त्यामुळे त्यांचे यावर्षीच्या आयपीएलचे आव्हानही संपुष्टात आले.
या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला 13च धावा करता आल्या. त्यामुळे पहिल्या 10 आयपीएल मोसमांमध्ये केलेला कारनामा रोहितला यावर्षीच्या आयपीएलमध्ये करण्यात अपयश आले.
रोहितला यावर्षी आयपीएलमध्ये 14 सामन्यात मिळुन 23.83 च्या सरासरीने फक्त 286 धावाच करता आल्या आहेत. यात त्याने 2 अर्धशतके केली आहेत.
त्यामुळे रोहितच्या बाबतीत 11 आयपीएल मोसमांमध्ये पहिल्यांदाच असे घडले की त्याला 300 धावांचा टप्पा पार करता आलेला नाही.
पहिल्या 10 आयपीएल मोसमांत त्याने 300 धावांचा टप्पा पार केला होता. आयपीएलचे 11 वे मोसम सुरु होण्याआधी प्रत्येक आयपीएल मोसमांत 300 धावांचा टप्पा पार करण्याचा विक्रम सुरेश रैना आणि रोहित शर्माच्या नावावर होता.
परंतू, आता हा विक्रम फक्त रैनाच्या नावावर झाला आहे. रैनाने यावर्षीही 300 धावांचा टप्पा पार केला आहे.
रोहितची 11 आयपीएलमधील कामगिरी:
2008: 404 धावा
2009: 362 धावा
2010: 404 धावा
2011: 372 धावा
2012: 433 धावा
2013: 538 धावा
2014: 390 धावा
2015: 482 धावा
2016: 489 धावा
2017: 333 धावा
2018: 286 धावा
महत्त्वाच्या बातम्या-
–धोनीच आहे आयपीएलमधील सर्वात हुशार विद्यार्थी, सर्व परीक्षेत १०० पैकी १०० गुण
–एका मुंबईकराने दुसऱ्याला पराभूत करत तिसऱ्या मुंबईकरासाठी खुली केली प्ले-आॅफची दारं
–सिंधुला बॅडमिंटनमध्ये दुहेरीत जोडीदार म्हणुन हवा धोनी !
–२० वर्षाच्या रिषभ पंतने आज जे केले ते अनेकांना ११ आयपीएलमध्ये करता आले नाही
-केवळ १ षटकारामुळे हुकला आयपीएलमधील सर्वात मोठा विक्रम