येत्या तीन जुलैपासून भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा सुरू होणार आहे. या इंग्लंड दौऱ्यात भारत तीन टी-20, तीन एकदिवसीय आणि पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
मात्र या इंग्लड दौऱ्यात भारतीय संघासाठी कसोटी मालिका महत्वाची असणार आहे. भारतीय संघाची इंग्लंडमध्ये कसोटीतील आजपर्यंतची कामगिरी म्हणावी अशी चांगली झालेली नाही.
भारतीय संघाने आजपर्यंत इंग्लंडमध्ये 18 कसोटी मालिका खेळल्या आहेत. त्यामध्ये भारताला 1971, 1986 आणि 2007 साली झालेल्या तीनच कसोटी मालिका जिंकण्यात यश आले आहे.
तर 2014 साली झालेल्या कसोटी मालिकेत भारताचा 3-1 अशा फरकाने पराभव स्विकारावा लागला होता.
त्यामुळे भारताचा हा दौरा कसोटी मालिकेच्या दृष्टीने महत्त्वाचा असणार आहे.
या पार्श्वभूमिवर भारताचा माजी फिरकी गोलंदाज आणि अनिल कुंबळेने भारताच्या या दौऱ्यातील कसोटी मालिकेविषयी आपली मते एका कार्यक्रमात व्यक्त केली.
“भारतीय संघात आता असे गोलंदाज आहेत जे कसोटी सामन्यांमध्ये सातत्याने विरोधी संघाला दोन्ही डावात बाद करत आहेत. तसेच आपली फलंदाजीही मजबूत आहे. इंग्लंड दौऱ्यावर गेलेला प्रत्येक भारतीय क्रिकेटपटूकडे सरासरी 50 कसोटी सामने खेळन्याचा अनुभव आहे.” असे भारताचा माजी कर्णधार कुंबळे म्हणाला.
“मला वाटते की या इंग्लंड दौऱ्यात भारताची फिरकी गोलंदाजी महत्वाची भूमिका निभावणार आहे. कारण आपल्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यात फिरकी गोलंदाजांनी जलदगती गोलंदाजांसाठी मदतगार असलेल्या खेळपट्यांवर चांगली कामगिरी केली होती. ” असे भारताचा माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे म्हणाला.
अनिल कुंबळेने भारताकडून इंग्लंडमध्ये 10 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 36 बळी मिळवले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी ही आहे आनंदाची बातमी
–Video: रशीद खानच्या भावाची गोलंदाजी पाहिली का?