भारताचा बहुप्रतिक्षित ऑस्ट्रेलिया दौरा 27 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. वनडे आणि टी-20 सामने संपल्यानंतर दोन्ही संघांमध्ये चार क्रिकेट सामन्यांच्या कसोटी मालिकेस सुरुवात होईल. डेविड वॉर्नरच्या कसोटी सामन्यांतील सलामीच्या जोडीदाराविषयी सध्या सुरू असलेल्या चर्चेत माजी कर्णधार रिकी पाँटिंगने आपली भूमिका मांडली आहे.
वॉर्नरबरोबर जो बर्न्सने सलामीला फलंदाजी करावी, असे मत पाँटिंगने व्यक्त केले आहे. जो बर्न्स आणि विल पुकोवस्की यांच्यात कसोटी क्रिकेटमधील सलामीची जागा मिळवण्यासाठीची चर्चा अजूनही सुरूच आहे.
जेव्हा पुकोवस्कीने शेफील्ड शिल्डमध्ये दोन दुहेरी शतके झळकावली, तेव्हा ही चर्चा आणखी वाढली. याउलट, बर्न्सची खेळी निराशाजनक होती. हे सत्य असूनही, पाँटिंगने म्हटले की, बर्न्सने वॉर्नरबरोबर खेळावे. कारण त्याने गेल्या वर्षी शेवटच्या पाच कसोटी सामन्यांत चांगली कामगिरी करून दाखविली होती.
“बर्न्सने फारशी खराब कामगिरी केली नाही. गेल्या उन्हाळ्यात तो ब्रिस्बेनमधील पहिल्या कसोटी सामन्यात खरोखरच चांगला खेळला. शेफील्ड शिल्ड क्रिकेटच्या पहिल्या काही सामन्यांमध्ये काय घडले ते आम्ही पाहिले. कारण त्याने बऱ्याच कालावधीपासून कसोटी सामना खेळला नव्हता. बरेच लोक गेल्या उन्हाळ्यात जे घडले ते विसरत आहेत,” असे पाँटिंगने सांगितले.
पाँटिंगने पुढे बोलताना सांगितले की, “आवश्यकता नसल्यास तुम्हाला बरेच बदल करण्याची इच्छा नसते.”
पाँटिंगने आपल्या काळात सर्वोत्कृष्ट खेळ करून ऑस्ट्रेलियन संघाला मोठ्या उंचीवर नेले होते. त्याने खेळाडूंमध्ये आत्मविश्वास भरला व त्यांना त्यांचा खेळ मुक्तपणे खेळू दिला. त्याला बर्न्सबद्दलही असेच वाटते आणि आता त्याला थोड्या आत्मविश्वासाची गरज आहे.
पाँटिंगने कर्णधारपदाच्या शैलीत म्हटले आहे की, “मला बदल करण्याची इच्छा नव्हती आणि नेहमी मला असे वाटत होते की कर्णधार म्हणून माझ्या संघातील खेळाडूंपैकी सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याची जबाबदारी माझी आहे.”