भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज श्रीसंत सामना फिक्सिंगच्या कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. अशातच भारतीय संघाचे माजी मानसिक संतुलन प्रशिक्षक पॅडी अप्टन यांच्या ‘द बेअरफूट कोच’ या पुस्तकात श्रीसंतबद्दल मोठा दावा केला आहे. त्यांनी असा दावा केला आहे की, एकदा वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतने राहुल द्रविडला शिवीगाळ केली होती. (The former Indian coach’s action was revealed, the players were advised)
श्रीसंतने दिली होती राहुल द्रविड यांना शिवी
पॅडी अप्टन यांनी आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून एस श्रीसंतवर राहुल द्रविड यांना उघडपणे शिवी दिल्याचा आरोप केला आहे. भारताचे माजी मानसिक संतुलन प्रशिक्षक असणार्या अप्टन यांनी आपल्या पुस्तकात लिहिले की, 2013 मध्ये ते राजस्थान रॉयल्स संघाचा एक भाग होते. त्याच वेळेस आयपीएल दरम्यान श्रीसंतला मुंबईविरुद्धच्या पहिल्या सामन्यात वगळण्यात आले होते. या निर्णयामुळे श्रीसंतला इतका राग आला की, त्याने द्रविडला उघडपणे शिवीगाळ दिली.
2013 मध्ये घडली घटना
स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचा खुलासा करत पॅडी अप्टन यांनी सांगितले की, 2013 मध्ये या खेळाडूंच्या आयपीएल दरम्यान सामना फिक्सिंगशी संबंधित संशयाची बातमी या संघाला यापूर्वी मिळाली होती. त्यानंतर शिस्तीचे उल्लंघन केल्यामुळे या तिन्ही खेळाडूंना संघातून काढून घरी पाठविण्यात आले. श्रीसंत, अंकित आणि अजित चंदेला हे खेळाडू होते. या तीनही खेळाडूंना 24 तासांच्या आत त्यांच्या वागणुकीमुळे संघातून बाहेर काढण्यात आले होते.
पॅडी अप्टन यांना श्रीसंतने खोटारडे म्हणून केले सिद्ध
पॅडी अप्टन यांच्या या आरोपाला उत्तर देताना श्रीसंत म्हणाला की, हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे.आणि तो खोट बोलत आहे. मी द्रविडला कधीही शिवी दिली नाही. मी नेहमीच माझ्या सहकारी खेळाडूंचा आदर केला आहे. हे जाणून मला वाईट वाटते. कारण पॅडी अप्टन इतरांना खुश करण्यासाठी अशा गोष्टी करत आहेत.
श्रीसंतवर घातली बंदी
तुम्हाला माहिती असेलच की, आयपीएल 2013 मध्ये श्रीसंत, अंकित आणि अजित यांच्यावर बीसीसीआयने आजीवन बंदी घातली होती. कारण हे सर्व सामना फिक्सिंगमध्ये सहभागी होते. श्रीसंतवरील बंदी अलीकडेच उठवण्यात आली असली, तरीही बीसीसीआयने यासंदर्भात कोणताही निर्णय दिला नाही. या आधीही पॅडी यांनी आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून भारताचे माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरला मानसिक दुर्बल खेळाडू म्हणून संबोधले होते.
माजी प्रशिक्षकाने भारतीय संघाला सेक्स करण्याचा सल्ला दिला होता
भारतीय क्रिकेट संघाच्या या माजी प्रशिक्षकाच्या मतानुसार, त्याने सामन्यापूर्वी खेळाडूंना सेक्स करण्याचा सल्ला दिला होता. पॅडी अप्टन यांनी आपल्या ‘द बेअरफूट कोच’ पुस्तकात याचा खुलासा केला. पॅडी अप्टन म्हणाले की, गॅरी कर्स्टन त्याच्या सेक्स चर्चेमुळे चिडला होता. पॅडीच्या मतानुसार, त्याने सामन्यापूर्वी खेळाडूंना फक्त शारीरिक संबंध ठेवण्याचा सल्ला दिला होता. असे त्याने एक माहिती सांगताना केले होते.
राजस्थान रॉयल्सचा प्रशिक्षक होते पॅडी अप्टन
परंतु नंतर पॅडी अप्टनने आपली चूक कबूल केली आणि सांगितले की, भारतीय संघाच्या खेळाडूंना लैंगिक संबंधाचा सल्ला देणे ही माझी मोठी चूक होती. मी फक्त सांगत होतो. पॅडी अप्टन हे भारतीय संघाचे माजी मानसिक संतुलन प्रशिक्षक तसेच आयपीएल संघ राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक होते.
पॅडी अप्टन यांनी दिली होती लैंगिक फायद्यांबद्दल माहिती
माजी प्रशिक्षक पॅडी यांनी आपल्या पुस्तकात ‘द वॉल’ राहुल द्रविडपासून ते गौतम गंभीरपर्यंत सर्व खेळाडूंचा उल्लेख केला आहे. 2009 मध्ये खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारी दरम्यान भारतीय संघाच्या खेळाडूंसाठी नोट्स तयार करत असल्याचे त्यांनी लिहिले आहे. ज्यामध्ये त्यांनी लैंगिक फायद्यांबद्दल सविस्तर माहिती दिली.
सेक्स केल्याने कामगिरी सुधारते?
प्रशिक्षक पॅडी यांनी आपल्या पुस्तकाच्या ‘इगो एँड माय ग्रेटेस्ट प्रोफेशनल एरर’ या चॅप्टरमध्ये नोट्सबद्दल चर्चा केली. त्यांनी खेळाडूंसाठी तयार केलेल्या नोट्समध्ये लिहिले होते की, ‘शारारिक संबंध ठेवल्याने तुमची कामगिरी सुधारते का? होय, ते वाढते.’
राहुल द्रविड हा श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून गेला आहे.
महत्वाच्या बातम्या-
सानियाचे ‘ग्रँड कमबॅक’! विम्बल्डनच्या पहिल्या फेरीत मिळवला विजय, मुलाने वाढविला उत्साह
जेव्हा वेस्ट इंडिजच्या बलाढ्य संघाला जगातील सर्वात कमजोर संघाने दाखवला होता चांगलाच इंगा
“मी अशा खेळाडूंच्या कानशिलात लगावली असती,” विश्वविजेत्या कर्णधाराची संतप्त प्रतिक्रिया






