---Advertisement---

माजी दिग्गज फलंदाजाने राहुलच्या शानदार खेळीचे केले कौतुक, म्हणाला, ‘तुम्ही त्याची खेळी…’

On: बुधवार, डिसेंबर 27, 2023 4:04 PM
KL-Rahul
---Advertisement---

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटीचा पहिला दिवस मंगळवारी (26 डिसेंबरला) संपला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत दिवसाचा खेळ संपेपर्यंत 59 षटकात 8 विकेट्स गमावून 208 धावा केल्या होत्या. भारतीय संघाचा डाव केएल राहुल याने सांभाळला, ज्याने 105 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 70 धावा केल्या होत्या.

केएल राहुल (KL Rahul) हा एकमेव भारतीय फलंदाज होता ज्याने भारताकडून अर्धशतक झळकावले होते. भारतीय संघाचे माजी फलंदाज संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी केएल राहुल याचे कौतुक केले आणि सांगितले की तो उत्कृष्ट शिस्तीने फलंदाजी करतो. मांजरेकर म्हणाले की, “राहुलमध्ये नक्कीच क्षमता आणि प्रतिभा आहे आणि त्याने आपले मन किती स्पष्ट आहे हे दाखवून दिले आहे. भारतीय संघाने ठराविक अंतराने विकेट गमावल्या, पण राहुलने एका बाजूने चांगली फलंदाजी करत संघाला 200 धावांच्या पुढे नेले.”

संजय मांजरेकर म्हणाले, “तुम्ही त्याची खेळी पाहाल तेव्हा लक्षात येईल की, त्याचे मन किती स्वच्छ आहे. त्याने ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू सोडला आणि जेव्हा चेंडू स्टंपच्या जवळ आला तेव्हा त्याने त्याचा जोरदार बचाव केला. जेव्हा त्याला थोडीशी जागा मिळाली तेव्हा त्याने चांगले फटके खेळले, त्यामुळे तो चांगल्या मानसिकतेत आहे हे दिसते. मी नेहमी मानसिकतेबद्दल बोलतो कारण ते प्रतिभा आणि क्षमतांनी परिपूर्ण आहे.”

भारताकडे आघाडी घेण्यासाठी पुरेशी धावसंख्या असल्याचे सांगितले. राहुलचे कसोटी क्रिकेटमधील हे 8 वे शतक आहे. भारताचं गोलंदाजी आक्रमन पाहता आघाडी घेण्यासाठी भारताकडे पुरेशा धावा आहेत. भारताकडे दर्जेदार गोलंदाजी आक्रमण आहे. (The former legendary batsman praised Rahul’s brilliant innings saying You his innings)

हेही वाचा

नाद नाद नादच! संघ अडचणीत असताना KL राहुलची क्लास Century, गगनचुंबी षटकाराने ठोकलं शतक
‘समालोचकांनी प्लेयर ऑफ द मॅच निवडला नाही पाहिजे…’, गंभीरच्या विधानाने वेधले क्रिकेट विश्वाचे लक्ष

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---