India vs England 4th Test: सध्या भारत विरूद्ध इंग्लंड संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेत आता यजमान संघाने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. नुकत्याच लॉर्ड्समध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने भारताला 22 धावांनी पराभूत केले. (Lord’s Test result) आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना आता मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळला जाईल. (India England 4th Test)
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पुढील कसोटी सामन्यात 8 दिवसांचे अंतर आहे. आता दोन्ही संघ 23 जुलै ते 27 जुलै दरम्यान मालिकेतील चौथा कसोटी सामना खेळतील. भारतीय वेळेनुसार हा सामनाही दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. सामन्याचा टॉस दुपारी 3.00 वाजता होईल. टीव्हीवर सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल. तुम्ही मोबाइल, टॅबलेट किंवा लॅपटॉपवरही थेट सामना पाहू शकता. या कसोटीचे लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ हॉटस्टारवर केले जाईल.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्समध्ये खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याचे पहिले सत्र दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. पहिले सत्र 2 तासांचे असेल. म्हणजे, 3.30 वाजता सामना सुरू होईल आणि 5.30 वाजेपर्यंत खेळला जाईल. त्यानंतर लंच ब्रेक होईल, जो 40 मिनिटांचा असेल. लंचनंतर सायंकाळी 6.10 वाजता सामना पुन्हा सुरू होईल. दुसरे सत्र देखील 2 तासांचे असेल. म्हणजे, रात्री 8.10 वाजता टी ब्रेक होईल. टी ब्रेक 20 मिनिटांचा असेल. (Tea break lunch schedule) रात्री 8.30 वाजता सामना पुन्हा सुरू होईल. त्यानंतर रात्री 10.00 वाजता दिवसाचा खेळ संपेल. जर पावसाने सामन्यात व्यत्यय आणला, तर वेळेत बदल केला जाऊ शकतो. कसोटी क्रिकेटच्या नियमांनुसार, एका दिवसात 90 षटकांचा खेळ होतो. (Test match rules)
पहिल्या 3 कसोटी सामन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, भारत-इंग्लंड संघातील पहिला कसोटी सामना हेडिंग्ले, लीड्सच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने भारताचा 5 गडी राखून पराभव केला. यानंतर बर्मिंगहॅममध्ये भारतीय संघाने दमदार पुनरागमन करत इंग्लंडला 336 धावांनी धूळ चारली. त्यानंतर लॉर्ड्समध्ये खेळला गेलेला तिसरा कसोटी सामना इंग्लंडने पाचव्या दिवशी 22 धावांनी जिंकला. आता इंग्लंड मालिकेत 2-1 ने पुढे आहे. अशा स्थितीत भारतीय संघाला मालिका जिंकण्यासाठी उर्वरित दोन्ही कसोटी कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागतील. तर, इंग्लंडला मालिका आपल्या नावावर करण्यासाठी फक्त 1 कसोटी जिंकणे पुरेसे आहे. त्यामुळे पुढील सामन्यात कोणता संघ बाजी मारेल? हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. (Series stats India vs England)






