India vs England 4th Test: सध्या भारत आणि इंग्लंड संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील तिसरा सामना नुकताच संपला आहे. 5 सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड 2-1 ने आघाडीवर आहे. चौथ्या कसोटीचे आयोजन मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे. भारतासाठी उर्वरित दोन सामने खूप महत्त्वाचे आहेत. जर त्यांना मालिकेत विजय मिळवायचा असेल, तर उर्वरित दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागेल. मात्र, इंग्लंडमध्ये होणाऱ्या सामन्यांमध्ये हवामानाची भूमिका मोठी असते. (India vs England 4th Test)
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात हवामानाची भूमिका मोठी असणार आहे. दोन्ही संघातील हा सामना 23 जुलै ते 27 जुलै या कालावधीत चालणार आहे. ओल्ड ट्रॅफर्ड कसोटीच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी पावसाची शक्यता आहे. पहिल्या दिवशी 39% आणि दुसऱ्या दिवशी 54% ढगाळ वातावरण राहील. मात्र, तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी हवामान स्वच्छ राहील, ही दोन्ही संघांसाठी चांगली गोष्ट आहे. पाचव्या दिवशीही ढगाळ वातावरण राहील आणि हलका पाऊस पडू शकतो. (Old Trafford Test weather)
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारत सध्या पिछाडीवर आहे. भारताने पहिला आणि तिसरा कसोटी सामना गमावला आहे. त्यांनी एजबॅस्टन येथे झालेला दुसरा सामना जिंकला होता. भारताला मालिकेत टिकून राहायचे असेल, तर त्यांना कोणत्याही परिस्थितीत ओल्ड ट्रॅफर्डमध्ये विजय मिळवावा लागेल. असे केल्यास भारत मालिकेत 2-2 अशी बरोबरी करू शकेल. जर भारतीय संघ हरला, तर मोठे नुकसान होईल. याच कारणामुळे पाऊस भारतीय संघासाठी धोक्याची घंटा ठरू शकतो. (IND vs ENG rain forecast)
ओल्ड ट्रॅफर्डमध्ये होणाऱ्या चौथ्या कसोटीत भारतीय संघात काही बदलांची अपेक्षा केली जाऊ शकते. करुण नायरची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. त्यामुळे त्याच्या जागी ध्रुव जुरेल किंवा साई सुदर्शनला संघात स्थान मिळू शकते. जसप्रीत बुमराहने यापूर्वीच सांगितले आहे की, तो मालिकेत फक्त तीनच सामने खेळेल. बुमराह 2 सामने खेळला आहे आणि कदाचित त्याला पाचव्या कसोटीसाठी वाचवून ठेवले जाईल. जर बुमराह खेळला नाही, तर अर्शदीप सिंगला संधी मिळू शकते. (Indian team changes)






