ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या बॉर्डर – गावस्कर ट्रॉफीमध्ये रोहित शर्मा चांगले प्रदर्शन करू शकला नाही. त्यापूर्वी न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत देखील रोहित शर्मा चांगली कामगिरी करू शकला नाही. मात्र त्यानंतर कटक वनडे मध्ये दमदार खेळी करून आपल्या विरोधकांना रोहित शर्माने तोडीसतोड उत्तर दिले. आता प्रश्न हा आहे की, जर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचे प्रदर्शन चांगले नाही राहिले तर रोहित शर्माचे काय होईल? या प्रश्नाचे उत्तर माजी भारतीय क्रिकेटर मोहम्मद कैफ यांनी दिले आहे. मोहम्मद कैफ यांनी आपल्या यूट्यूब चॅनल वरती आपले मत मांडले व त्यात त्यांनी रोहित शर्माचे भरपूर कौतुक केले आहे.
मोहम्मद कैफ यांचे म्हणणे आहे की, रोहित शर्माने कर्णधार म्हणून जे काही मिळविले आहे, ते इतर कोणत्याच खेळाडूला जमले नसते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली असलेला भारतीय संघ वनडे वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम टप्प्यात पोहोचला होता. त्यानंतर आपल्या भारतीय संघाने जास्त वनडे सामने खेळले नाहीत. जर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचे प्रदर्शन चांगले नसेल तर कोचिंग स्टाफ वरती संकट येऊ शकते, पण रोहित शर्माला याचा काही फरक पडणार नाहीये.
त्याबरोबरच मोहम्मद कैफ म्हणतात की, रोहित शर्मा कर्णधार म्हणून उत्तम आहे. वनडे फॉरमॅट हे या गोष्टीचा साक्षीदार आहेत. मोहम्मद कैफ म्हणतात, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघ चांगली कामगिरी करू शकला नाही तरीदेखील रोहित वर्ल्ड कप 2027 मध्ये खेळण्यासाठी पात्र असू शकतो. सध्या रोहित शर्मा चांगल्या फॉर्म मध्ये खेळत आहे. याचाच भारतीय संघाला फायदा होईल.
महत्वाच्या बातम्या :
शुबमन गिल भारताचा उपकर्णधार कसा झाला? रोहित शर्माने सांगितले मोठे कारण!
वीरेंद्र सेहवाग आणि पार्थिव पटेलची बाबर आझमवर खिल्ली, चाहत्यांमध्ये चर्चा
IND vs BAN; रोहित शर्माच्या चुकामुळे अक्षर पटेलच्या हॅट्ट्रिकची संधी हुकली!






